जाहिरात
मराठी बातम्या / मनी / नोकरदारांसाठी महत्त्वाचे: Job सोडल्यानंतर PF रक्कम काढण्याची घाई करेल नुकसान, 3 वर्षापर्यंत मिळत राहतं व्याज

नोकरदारांसाठी महत्त्वाचे: Job सोडल्यानंतर PF रक्कम काढण्याची घाई करेल नुकसान, 3 वर्षापर्यंत मिळत राहतं व्याज

नोकरदारांसाठी महत्त्वाचे: Job सोडल्यानंतर PF रक्कम काढण्याची घाई करेल नुकसान, 3 वर्षापर्यंत मिळत राहतं व्याज

कित्येक लोक नोकरी सोडल्यानंतर आपल्या ईपीएफ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) खात्यामधील पूर्ण रक्कम काढून घेतात. पुढील नोकरी मिळेपर्यंत पीएफ खात्यात (PF Account) रक्कम जमा होणार नाही, आणि ते बंद पडेल याची भीती असल्यामुळे बऱ्याच वेळा हा निर्णय घेतला जातो. मात्र हा निर्णय नुकसानकारक ठरेल

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 16 जुलै: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) हा सर्वच नोकरदारांसाठी फायद्याचा असतो. निवृत्त झाल्यानंतर या निधीमुळे कर्मचाऱ्यांकडे बऱ्याच प्रमाणात सेव्हिंग राहतं. पण बऱ्याच वेळा आपण पाहतो की कित्येक लोक नोकरी सोडल्यानंतर आपल्या ईपीएफ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) खात्यामधील पूर्ण रक्कम काढून घेतात. पुढील नोकरी मिळेपर्यंत पीएफ खात्यात (PF Account) रक्कम जमा होणार नाही, आणि ते बंद पडेल याची भीती असल्यामुळे बऱ्याच वेळा हा निर्णय घेतला जातो. पण तुम्हीही असं करणार असाल, तर थांबा. एकत्रच सगळी रक्कम काढून घेतल्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. बऱ्याच जणांना हे माहिती नसेल, पण नियमांनुसार नोकरी सोडल्यानंतर तीन वर्षांपर्यंत कंपनी किंवा आपण आपल्या खात्यात रक्कम नाही भरली, तरीही तुमचं ईपीएफ खातं (EPF Account) सुरू राहू शकतं. त्यामुळे ईपीएफमधील रक्कम काढून (PF Withdrawal) घेण्याऐवजी, नवी नोकरी मिळेपर्यंत थांबणं हाच सर्वात फायदेशीर निर्णय आहे. नवी नोकरी मिळाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी जुनाच ईपीएफ खाते क्रमांक देऊ शकता; किंवा मग तिथलं ईपीएफ खातं आणि जुनं ईपीएफ खातं एकत्र म्हणजेच मर्ज करु शकता. हे वाचा- Gold Price: पुन्हा महागलं सोनं, तरी सर्वोच्च स्तरापेक्षा 7590 रुपयांनी स्वस्त नोकरी सोडल्यानंतरही मिळत राहतं व्याज फायनॅन्शिअल एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार; तुम्ही नोकरी सोडली, किंवा मग काही कारणांमुळे तुमची नोकरी गेली तरीही पुढील तीन वर्षांपर्यंत तुमच्या ईपीएफ खात्यातील रकमेवर व्याज मिळत राहतं. त्यामुळे तुम्हाला पैशांची तातडीने गरज नसेल, तर तुम्ही या खात्यातील रक्कम तशीच ठेऊ शकता. याचा तुम्हालाच भविष्यात फायदा होतो. तीन वर्षे होण्याआधी काही रक्कम काढून घेणे गरजेचे जर नोकरी सोडल्यानंतर 36 महिने म्हणजेच तीन वर्षांपर्यंत तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये कोणतेही कॉन्ट्रिब्युशन (PF Contribution) झाले नाही; तर तुमचे खाते निष्क्रिय श्रेणीमध्ये (In Operative Account) जाते. त्यामुळे तुमच्या खात्याला सक्रिय ठेवण्यासाठी तीन वर्षांपूर्वी तुम्ही काही रक्कम काढून घेणं किंवा काही रक्कम जमा करणं गरजेचं आहे. म्हणजेच त्या खात्यात काहीतरी आर्थिक व्यवहार झाला तर ते चालू राहतं. हे वाचा- SBI ALert! आज-उद्या बंद राहणार महत्त्वाच्या सेवा, खोळंबा टाळण्यासाठी जाणून घ्या या व्याजावर भरावा लागतो कर तीन वर्षांपर्यंत कोणतीही रक्कम न भरता खातं सक्रिय राहत असलं, तरी त्याला काही नियम आहेत. या काळामध्ये खात्यामधील रकमेवर जे व्याज मिळत राहतं, त्या व्याजाला कर लागू होतो (Tax on Interest Income). तसेच, ईपीएफ खातं निष्क्रिय झाल्यानंतरही तुम्ही जर क्लेम केलं नाही, तर खात्यामधील रक्कम सीनियर सिटिझन्स वेलफेअर फंडमध्ये (SCWF) जाते. एकूणच, नोकरी सोडल्यानंतर ईपीएफ काढून न घेता तसाच ठेवणं फायदेशीर असलं; तरीही आपल्या खात्यावर लक्ष ठेवणंही गरजेचं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात