जाहिरात
मराठी बातम्या / मनी / आधार कार्डातल्या 'या' 6 गोष्टी बदलताना लागत नाहीत कुठलीच कागदपत्र

आधार कार्डातल्या 'या' 6 गोष्टी बदलताना लागत नाहीत कुठलीच कागदपत्र

आधार कार्डातल्या 'या' 6 गोष्टी बदलताना लागत नाहीत कुठलीच कागदपत्र

Aadhar Card - आधार कार्डातली चूक बदलण्यासाठी काय करायचं ते घ्या जाणून

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 सप्टेंबर : आधार कार्डाचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतंय. कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचं असतं. म्हणूनच आधारमध्ये योग्य माहिती असणं आवश्यक असतं. कधी तरी चुकून आधार कार्डात चूक होते. पण त्यातल्या काही गोष्टी कुठल्याही कागदपत्रांशिवाय बदलता येतात. यात तुमचं नाव, फोन नंबर, ईमेल आयडी, फोटो, फिंगर प्रिंट आणि डोळ्यांचं स्कॅनिंग या गोष्टी येतात. यात बदल करायचा असेल तर तुम्हाला कागदपत्रांची गरज लागणार नाही. आधार सेवा केंद्रात ऑनलाइन अपाॅइंटमेंट घेऊ शकता आधार कार्डात पत्ता सोडला तर  कुठलीही माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रातच जावं लागतं. त्यासाठी ऑनलाइन अपाॅइंटमेंट घ्यावी लागते. UIDAI नं आधार सेवा केंद्रांवर पासपोर्ट सेवा केंद्राप्रमाणे ऑनलाइन अपाॅइंटमेंट बुकिंग सुविधा सुरू केलीय. UIDAI नं ट्वीट करून ही माहिती दिलीय. हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये 9 पदांसाठी 164 व्हेकन्सी, ‘असा’ करा अर्ज

जाहिरात

आधारसाठी अप्लाय, इनराॅल केल्यानंतर आधार तयार व्हायला 90 दिवस लागतात. दरम्यान तुम्ही UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन आधार स्टेट्स तपासू शकता. अपडेशनसाठीही असंच आहे. यासाठी तुमच्याकडे आधार सेंटरकडून मिळालेली इनराॅलमेंट स्लिप हवी. बँकेत नोकरीची मोठी संधी, राज्यात 1257 जागांवर भरती,‘अशी’ होईल परीक्षा काय आहे प्रक्रिया? पहिल्यांदा https://uidai.gov.in/ वर जा. माय आधार सेशनमध्ये चेक आधार स्टेटसवर क्लिक करा. यात इनराॅलमेंट नंबर टाका. हा 14 अंकी नंबर आहे. हा नंबर इनराॅलमेंट स्लिपच्या टाॅपवर असतो. सोबत इनराॅलमेंटचा दिवस, वेळही असते. हे दोघं एकत्र करून इनराॅलमेंट आयडी तयार होतो. नराॅलमेंट नंबर, आयडी टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाका. NITI Aayog Recruitment 2019 : ‘या’ पदांवर व्हेकन्सी, पगार 2 लाखांपेक्षा जास्त चेक स्टेट्सवर क्लिक करा तुमचं आधार कार्ड प्रोसेसमध्ये असलं तर तसा मेसेज दिसेल. तयार झालं तर तसा मेसेज दिसेल. तुमचा मोबाइल नंबर रजिस्टर्ड असेल, तर आधार तयार झाल्यावर तुम्हाला UIDAI कडून मेसेज येईल. तुम्ही वेबसाइटवर जाऊन डाउनलोड करू शकता. या प्रकारेही करू शकता चेक आधार कार्ड तपासण्यासाठी दुसरी पद्धतही आहे. UIDAI ची हेल्पलाइन 1947 आहे. तिथे तुम्हाला माहिती मिळू शकते. इनराॅलमेंट स्लिप हरवली तर वापरा ही पद्धत इनराॅलमेंट स्लिप हरवली तरी पुन्हा मिळू शकते. पण त्यासाठी तुमचा फोन नंबर रडिस्टर्ड हवा. तुम्ही uidai.gov.in क्लिक करा. नंतर जरुरी माहिती भरा. तुम्हाला OTP येईल. तो टाकून व्हेरिफाय झाल्यावर इनराॅलमेंट नंबर फोन किंवा ईमेलवर येईल. भाजप प्रवेशानंतर उदयनराजेंनी सांगितलं राष्ट्रवादी सोडण्याचं कारण, पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात