मुंबई, 13 सप्टेंबर : हिंदुस्तान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड या कंपनीत व्हेकन्सी आहे. प्रोजेक्ट इंजिनीयर, लाॅ ऑफिसर आणि HRO अशा 9 पदांसाठी 164 व्हेकन्सीज निघाल्यात. योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी hindustanpetroleum.com इथे जाऊन अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर आहे. पद आणि पद संख्या मेकॅनिकल प्रोजेक्ट इंजीनियर: 63 सिविल प्रोजेक्ट इंजीनियर: 18 इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट इंजीनियर: 25 बँकेत नोकरीची मोठी संधी, राज्यात 1257 जागांवर भरती,‘अशी’ होईल परीक्षा इन्स्ट्रुमेंटेशन प्रोजेक्ट इंजीनियर: 10 केमिकल रिफायनरी इंजीनियर: 10 लॉ ऑफिसर: 4 क्वालिटी कंट्रोल ऑफिसर: 20 ह्युमन रिसोर्स ऑफिसर: 8 फाइन अॅण्ड सेफ्टी ऑफिसर: 6 NITI Aayog Recruitment 2019 : ‘या’ पदांवर व्हेकन्सी, पगार 2 लाखांपेक्षा जास्त या सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला संबंधित क्षेत्रात कामाचा अनुभव हवा. उमेदवाराची निवड लिखित परीक्षा, इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशन याद्वारे होईल. परीक्षेची पद्धत लिखित परीक्षा दोन भागांमध्ये होईल. पेपरच्या दोन भागांमध्ये जनरल अॅप्टिट्युड आणि टेक्निकल प्रोफेशनल नाॅलेज असेल. इंग्लिश भाषेची परीक्षाही असेल. लिखित परीक्षेसाठी कमीत कमी गुण 60 टक्के आणि SC/ST/PWD/OBCNC साठी 54 टक्के हवेत. ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर मिळेल ‘ही’ मोठी संधी ग्रुप डिस्कशनमध्ये सर्वसाधारण उमेदवाराचे गुण 40 टक्के हवेत तर SC/ST/PWD/OBCNC साठी 33.33 टक्के हवेत. इंटरव्ह्यूमध्ये 40 टक्के मार्क हवेत. SC/ST/PWD/OBCNC साठी 33.33 टक्के हवेत. तसंच, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये क्लार्कच्या जागा भरण्यात येणार आहेत. इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शननं ही घोषणा केलीय.एकूण 12 हजार व्हेकन्सी आहेत. त्यात महाराष्ट्रातल्या बँकांमध्ये 1 हजार 257 जागांचा समावेश आहे देशभरातल्या अलाहबाद बँक, कॅनरा बँक, इंडियन ओवरसिज बँक, सिंडिकेट बँक, आंध्रा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युसीओ बँक, बँक ऑफ बरोडा, कॉर्परेशन बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब अॅण्ड सिंडिकेट बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांमध्ये व्हेकन्सीज आहेत. VIDEO : शिवबंधनात अडकताच जाधवांनी दिलं मिलिंद नार्वेकरांवर टीकेचं स्पष्टीकरण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.