बँकेत नोकरीची मोठी संधी, राज्यात 1257 जागांवर भरती,'अशी' होईल परीक्षा

बँकेत नोकरीची मोठी संधी, राज्यात 1257 जागांवर भरती,'अशी' होईल परीक्षा

Banks, Jobs - बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 13 सप्टेंबर : तुम्हाला बँकेत नोकरी करायचीय? मग मोठी संधी तुमच्या समोर आलीय. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये क्लार्कच्या जागा भरण्यात येणार आहेत. इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शननं ही घोषणा केलीय.एकूण 12 हजार व्हेकन्सी आहेत. त्यात महाराष्ट्रातल्या बँकांमध्ये 1 हजार 257 जागांचा समावेश आहे

कोणकोणत्या बँकांमध्ये व्हेकन्सी?

देशभरातल्या अलाहबाद बँक, कॅनरा बँक, इंडियन ओवरसिज बँक, सिंडिकेट बँक, आंध्रा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युसीओ बँक, बँक ऑफ बरोडा, कॉर्परेशन बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब अॅण्ड सिंडिकेट बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांमध्ये व्हेकन्सीज आहेत.

NITI Aayog Recruitment 2019 : 'या' पदांवर व्हेकन्सी, पगार 2 लाखांपेक्षा जास्त

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी हवी.

वयाची मर्यादा

20 ते 28 वयोगटातले उमेदवार अर्ज करू शकतात.

ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर मिळेल 'ही' मोठी संधी

अर्ज करण्याची तारीख

17 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर 2019 या काळात उमेदवार अर्ज करू शकतात.

निवडीची प्रक्रिया

आयबीपीएस क्लार्क प्रीलिम्स परीक्षा आणि आयबीपीएस क्लार्क परीक्षा घेतली जाईल. आयबीपीएस क्लार्क प्रीलिम्स परीक्षा 7,8,14 आणि 15 डिसेंबरला होईल. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांसाठी आयबीपीएस क्लार्क मुख्य परीक्षा 19 जानेवारी 2020 रोजी घेतली जाईल.

MMRDA Recruitment 2019 : इंजिनीयर्ससाठी मेट्रोमध्ये बंपर व्हेकन्सी

दोन्ही परीक्षांसाठी इच्छुकांनी एकाच वेळी अर्ज करावा. परीक्षेची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर 2019 आहे. नोव्हेंबरमध्ये हाॅल तिकीट मिळेल.

तसंच,  नीती आयोगात अनेक पदांवर व्हेकन्सी आहे. यात सीनियर स्पेशॅलिस्ट, सीनियर असोसिएट, असोसिएट, वरिष्ठ सल्लागार आणि सल्लागार या पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑफिशियल वेबसाइट www.niti.gov.in वर ऑनलाइन डिटेल्स तपासून पाहू शकतात.

VIDEO : शिवबंधनात अडकताच जाधवांनी दिलं मिलिंद नार्वेकरांवर टीकेचं स्पष्टीकरण

Published by: Sonali Deshpande
First published: September 13, 2019, 6:33 PM IST
Tags: jobs

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading