Home /News /money /

आता या तारखेपर्यंत पूर्ण करा PAN-Aadhaar लिंक करण्याचं काम, अन्यथा करावा लागेल समस्यांचा सामना

आता या तारखेपर्यंत पूर्ण करा PAN-Aadhaar लिंक करण्याचं काम, अन्यथा करावा लागेल समस्यांचा सामना

तुम्ही देखील अद्याप पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक ( Aadhaar-PAN linking deadline) करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

    नवी दिल्ली, 18 सप्टेंबर: तुम्ही देखील अद्याप पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक ( Aadhaar-PAN linking deadline) करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता हे काम पूर्ण करण्यासाठी सरकारने डेडलाइन वाढवली आहे. आता तुम्हाला मार्च 2022 पर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक करता येणार आहे. कोरोना काळात सामान्यांना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे, ते लक्षात घेता केंद्र सरकारने ही डेडलाइन पुढे ढकलली आहे. सीबीडीटीने दिलेल्या माहितीनुसार, पॅनला आधारशी जोडण्यासाठी आयकर विभागाला आधार संख्या कळवण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, आयकर कायद्यांतर्गत दंडाची कार्यवाही पूर्ण करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 पासून 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. याशिवाय, बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंध अधिनियम, 1988 अन्वये न्यायनिर्णय प्राधिकरणाने नोटीस बजावण्याची आणि आदेश पारित करण्याची अंतिम मुदतही मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. हे वाचा-घसरण होऊनही सोन्याचे दर 45 हजारांपेक्षा जास्त, जाणून घ्या आजचा भाव भरावा लागेल दंड जर 31 मार्च 2022 पर्यंत तुम्ही आधार कार्ड तुमच्या पॅन कार्डशी लिंक केलं नाही तर त्यानंतर तुम्हाला पॅन कार्डचा वापर करता येणार नाही. याशिवाय तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय देखील होईल. तसंच तुम्हाला सरकारी लाभ देखील मिळणार नाही. 31 मार्च 2022 नंतर तुम्हाला आर्थिक व्यवहारांकरता पॅन कार्डचा वापर करता येणार नाही. पॅन कार्डशिवाय बँकिंग व्यवहार, म्युच्युअल फंड, डिमॅट खाते, नवीन बँक खाते उघडणे इ. यासारख्या अनेक आर्थि व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय रद्द झाल्यानंतर तुम्ही पॅन कार्डचा वापर केलात तर हा आयकर अधिनियम अंतर्गत कलम 272बीचे उल्लंघन मानले जाईल. अशावेळी पॅन कार्डधारकाला 1000 रुपयांचा दंड भरावा लागेल. हे वाचा-Petrol Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, काय आहेत महत्त्वाच्या शहरातील भाव ऑनलाइन करता येईल लिंक तुम्ही इन्कम टॅक्सच्या नवीन वेबसाइटच्या आधारे माहित करुन घेऊ शकता की तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही. जाणून घेण्याकरता तुम्ही www.incometaxindiaefiling.gov.in  या इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर जा. याठिकाणी तुम्हाला ‘Link Aadhaar’ चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल. त्याठिकाणी आधार कार्डावरील नाव, तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा. आधार कार्डवर केवळ जन्माचं वर्ष असेल तर तसा पर्याय निवडा. कॅप्चा टाकून लिंक आधारवर क्लिक करा. अशाप्रकारे सोप्या पद्धतीने तुमचं आधार पॅन कार्डशी लिंक होईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Aadhar card link, Pan card

    पुढील बातम्या