नवी दिल्ली, 18 सप्टेंबर: सोन्याच्या दरात (
Gold Price Today) शनिवारी घसरण पाहायला मिळाली आहे. शनिवारी सोन्याचे दर 45,390 रुपये प्रति तोळावर (
Gold Rates Today) पोहोचले आहेत. सोन्याचे दर 45,780 रुपये प्रति तोळावरून कमी होऊन 45,390 रुपये झाले आहेत. तर चांदीचे दर 61,600 रुपये प्रति (
Silver Price Today) किलोवर आहे. गुडरिटर्न्स वेबसाइटने हे दर जारी केले आहेत.
सोन्याची खरेदी करणारा भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारतातील विविध शहरात सोन्याचे दर वेगवेगळे असतात. कारण एक्साइज ड्युटी, राज्यांतील कर आणि घडणावळीसाठी लागलेले शुल्क यामुळे सोन्याचे दर वेगवेगळे असतात.
22 कॅरेट सोन्याचा दर
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, आज नवी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 45,550 रुपये प्रति तोळा आहे. तर मुंबईमध्ये 22 कॅरेटचा दर 45,390 रुपये प्रति तोळा आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 43,710 रुपये प्रति तोळा आहेत.
हे वाचा-1 लाखाचे झाले 7.50 लाख, अवघ्या 6 महिन्यांत 'या' शेअरनं दिला 650% परतावा
24 कॅरेट सोन्याचा दर
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, 24 कॅरेट सोन्याच्या दरातही आज घसरण पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 46,780 रुपये प्रति तोळा होता. आज या शुद्धतेच्या सोन्याचा दर 46,390 रुपये प्रति तोळा आहे.
चांदीचे आजचे दर
सोन्यासह आज चांदीच्या किंमतीत देखील घसरण पाहायला मिळाली आहे. वेबसाइटवरील आकड्यांनुसार चांदीचे दर 1200 रुपयांनी कमी झाले आहेत. शुक्रवारी चांदीचे दर 62,800 रुपये प्रति किलो होते. त्यामध्ये घसरण होऊन आज दर 61,600 रुपये प्रति किलोग्रॅम आहेत.
हे वाचा-Petrol Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, काय आहेत महत्त्वाच्या शहरातील भाव
कशी तपासाल सोन्याची शुद्धता?
जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर
तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.