मराठी बातम्या /बातम्या /मनी /Breaking News : आधार-पॅन लिंक करण्याची तारीख वाढवली, पाहा नवी अपडेट

Breaking News : आधार-पॅन लिंक करण्याची तारीख वाढवली, पाहा नवी अपडेट

aadhar pan link (1)

aadhar pan link (1)

आताची सर्वात मोठी बातमी! आधार पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली, पाहा शेवटची तारीख कधी?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : आताची सर्वात मोठी बातमी आणि ज्या ग्राहकांनी अजूनही आधार आणि पॅन कार्ड अपडेट केलं नाही त्यांच्यासाठी केवळ ही शेवटचं संधी असणार आहे. आयकर विभाग आणि सरकारने आधार पॅन लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. आज सकाळपासून आयकर विभागाच्या वेबसाईटला आधार पॅन लिंक करताना अनेकांना अडचणी जाणवत होत्या.

या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन आता आधार पॅनकार्ड लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. याआधी आधार पॅन लिंक करण्याची मुदत ही 31 मार्च 2023 होती. ही मुदत संपल्यानंतर पॅनकार्ड रद्द होणार होतं. मात्र आता ही मुदत वाढवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Fact Check : तुमच्या बायकोकडे Pan card असेल तर सरकार देणार 10 हजार?

आधार पॅनकार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्या ग्राहकांनी अजूनही आधार पॅन लिंक केलं नाही, त्यांनी तातडीनं करून घ्या. यानंतर मुदतवाढ होणार नाही. आधार पॅनकार्ड लिंक करण्यासाठी आता 1000 रुपये दंड आकारला जाते.

First published:
top videos

    Tags: Aadhar Card, Pan Card, Pan card online