मराठी बातम्या /बातम्या /मनी /Aadhaar कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAI ने बंद केली ही सेवा, वाचा सविस्तर

Aadhaar कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAI ने बंद केली ही सेवा, वाचा सविस्तर

UIDAI कडून त्यांच्या ग्राहकांना विविध सेवा पुरवल्या जातात. अलीकडेच UIDAI ने आधार रिप्रिंट करण्याची सेवा बंद केली आहे अर्थात आता ऑनलाइन आधार रिप्रिंट करता येणार नाही

UIDAI कडून त्यांच्या ग्राहकांना विविध सेवा पुरवल्या जातात. अलीकडेच UIDAI ने आधार रिप्रिंट करण्याची सेवा बंद केली आहे अर्थात आता ऑनलाइन आधार रिप्रिंट करता येणार नाही

UIDAI कडून त्यांच्या ग्राहकांना विविध सेवा पुरवल्या जातात. अलीकडेच UIDAI ने आधार रिप्रिंट करण्याची सेवा बंद केली आहे अर्थात आता ऑनलाइन आधार रिप्रिंट करता येणार नाही

नवी दिल्ली, 28 मे: तुम्ही आधार कार्डधारक (Aadhar Card Holder) आहात आणि तुम्हाला देखील काही अपडेट त्यामध्ये करायचे असतील तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. UIDAI कडून त्यांच्या ग्राहकांना विविध सेवा पुरवल्या जातात. आधारमध्ये जन्मतारीख, नाव अपडेट करण्यापासून नवीन आधार बनवण्यापर्यंत तुम्हाला सेवा दिल्या जातात. मात्र अलीकडेच UIDAI ने आधार रिप्रिंट करण्याची सेवा बंद केली आहे अर्थात आता ऑनलाइन आधार रिप्रिंट करता येणार नाही.

UIDAI ने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. आधार हेल्प सेंटरने एका ग्राहकाच्या प्रश्नाचं निरसन करताना आधार रिप्रिंट करण्याची सेवा बंद करण्यात आल्याची माहिती दिली आहे. भावेश पटेल या ट्विटर युजरने ट्विटरवर आधार हेल्प सेंटरच्या अधिकृत पेजला टॅग करत याबाबत सवाल केला होता की, UIDAI च्या वेबसाइटवर Aadhaar reprint सर्व्हिस व्हिजिबल नाही आहे.

UIDAI ने ट्वीट करत दिला रिप्लाय

UIDAI ने या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, प्रिय निवासी ऑर्डर आधार रिप्रिंट सर्व्हिस बंद करण्यात आली आहे. तुम्ही त्याऐवजी आधार पीव्हीसी कार्ड ऑनलाइन ऑर्डर करू शकता. तुम्हाला फ्लेक्झिबल पेपर फॉरमॅटमध्ये आधार बाळगायचे असेल तर तुमच्या ई-आधारची प्रिंट देखील काढू शकता.'

कशाप्रकारे बनवाल आधार पीव्हीसी कार्ड?

-PVC आधार कार्ड बनवण्याचा अर्ज करण्यासाठी UIDAI च्या वेबसाइटवर uidai.gov.in अथवा resident.uidai.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.

-वेबसाइटवर आपला आधार कार्ड नंबर, व्हर्चुअल आयडी नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल.

-50 रुपये फी देऊन तुम्हाला आधार कार्ड ऑर्डर करावं लागेल. काही दिवसांनी ते तुम्ही दिलेल्या पत्त्यावर घरपोच येऊन जाईल.

हे वाचा-Success Story: 'हा' व्यवसाय सुरू करून दोन भाऊ बनले कोट्यवधींचे मालक

जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल तरीही तुम्ही पीव्हीसी आधाार कार्डसाठी अर्ज करू शकता. त्यासाठी

खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

-https://residentpvc.uidai.gov.in/order-pvcreprint या वेबसाईटवर जा.

-तुमचा आधार कार्ड नंबर रजिस्टर करा.

-सिक्योरिटी कोड भरा आणि खाली दिलेल्या my mobile not registered या ऑप्शनवर क्लिक करा.

-त्यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी नंबर येईल तो ओटीपी नंबर तिथे टाका.

-50रुपये भरल्यानंतर तुमचा अर्ज पूर्ण होईल.

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर दोन आठवड्याच्या आत तुमचे पीव्हीसी आधार कार्ड तुमच्या घरी येईल आणि विविध सरकारी योजनांसाठी तुम्हाला त्याचा वापर करता येईल.

 

First published:
top videos

    Tags: Aadhar card, Aadhar card link