मुंबई, 31 मे : आधार कार्ड हे भारतातील महत्त्वाचे डॉक्यूमेंट आहे. आधार कार्डा शिवाय कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेणं कठीण होतं. त्यामुळे त्यासंबंधी ज्या काही उणिवा आहेत, त्या पूर्ण करणे आवश्यक आहे. अशा वेळी आधार कार्डशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्या लोकांनी 10 वर्षांपूर्वी आधारकार्ड बनवलं होतं. त्यांना UIDAI कडून आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितले जात आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सहसा चार्ज आकारले जाते. मात्र UIDAI सध्या ते मोफत अपडेट करण्याची सुविधा देत आहे.
या तारखेपर्यंत फ्रीमध्ये करा अपडेट
आधार कार्डमध्ये लोकांचे नाव, पत्ता, फोटो, बायोमेट्रिक डेटा अशी महत्त्वाची माहिती असते. डिजिटल इंडिया अंतर्गत 14 जूनपर्यंत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा मोफत देण्यात आली आहे. UIDAI myAadhaar पोर्टलनुसार ही सेवा मोफत आहे. त्याचबरोबर आधार केंद्रांवर अपडेट करण्यासाठी 50 रुपये चार्ज भरावे लागणार आहे. या अंतर्गत केवळ ओळख आणि पत्त्याचा पुरावा मोफत अपडेट केला जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलंय. तुम्ही 14 जूनपर्यंत अपडेट केलं नाही तर त्यानंतर तुम्हाला 100 रुपयांपेक्षा जास्त चार्ज आकारावे लागेल. आधार कार्डवर नाव, लिंग, जन्मतारीख मोफत अपडेट केली जाणार नाही.
तुम्ही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता का? मग ही माहिती तुम्हाला असायलाच हवीआधार मोफत कसे अपडेट करायचे?
-सर्वप्रथम, https://myaadhaar.uidai.gov.in/ वर क्लिक करा आणि तुमचा आधार नंबर टाका. -यानंतर OTP व्हेरिफाय करा. -डॉक्यूमेंट अपडेटचा पर्याय निवडून ते व्हेरिफाय करा. -यानंतर, ड्रॉप लिस्टमध्ये तुमचा आयडी प्रूफ आणि अॅड्रेस प्रूफ स्कॅन करा आणि अपलोड करा. -यानंतर 14 अंकी अपडेट रिक्वेस्ट नंबर (UNR) जनरेट होईल. -यानंतर तुमच्या फोन नंबरवर आधार कार्ड अपडेटची माहिती येईल. -अपडेट केल्यानंतर तुमचे अपडेट केलेले आधार कार्ड डाउनलोड करा.