नवी दिल्ली, 09 ऑगस्ट: आधार कार्ड (Aadhaar Card) हा एक अत्यंत महत्त्वाचा सरकारी दस्तावेज आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. अनेक सरकारी तसंच खासगी कामांमध्ये आधार कार्ड आवश्यक असते. आधार कार्ड बनवून घेण्यासाठी किंवा त्यात काही सुधारणा करायच्या असतील तर त्यासाठी आधार केंद्रांची सुविधा (Aadhaar Card) उपलब्ध करण्यात आली आहे. अशा आधार केंद्राची फ्रेंचायझी (Aadhaar Card Franchise) घेऊन तुम्हीही चांगली कमाई करू शकता. एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा तुमचा विचार असेल तर हा एक अत्यंत कमी भांडवलाची गरज असणारा आणि घरबसल्या लाखो रुपयांची कमाई करून देणारा व्यवसाय आहे. आधार कार्ड फ्रेंचायझी घेण्यासाठीची प्रक्रिया जाणून घेऊ या ...
फ्रेंचायझी घेण्यासाठीची प्रक्रिया:
तुम्ही आधार कार्ड फ्रेंचायझी (Aadhaar Card Franchise) अगदी विनामूल्य घेऊ शकता. फक्त हा व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना (License) घ्यावा लागेल आणि त्यासाठी एक परीक्षा (Exam) उत्तीर्ण करावी लागेल. यूआयडीएआय प्रमाणपत्रासाठी (UIDAI Certification) यूआयडीएआयतर्फे (UIDAI) ही ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. यात उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला आधार नोंदणी आणि बायोमेट्रिक पडताळणी करावी लागेल. नंतर, कॉमन सर्व्हिस सेंटरची (CSC) नोंदणी करावी लागेल.
तुमच्या कामाची बातमी! दररोज 416 रुपयांची गुंतवणूक करुन मिळवू शकता 1 कोटी, जाणून घ्या डिटेल्स
अर्ज करण्याची प्रक्रिया:
आधार कार्ड सेंटर उघडण्यासाठी आधी तुम्हाला ऑनलाइन परवान्यासाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना हा परवाना मिळतो. परवान्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अशी आहे.
सर्व प्रथम एनएसईआयटीच्या (NSEIT) वेबसाइटवर जा (https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action).
इथं तुम्हाला Create New User ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
आता एक एक्सएमएल फाईल उघडेल.
तिथं Share Code enter टाकण्यास सांगितले जाईल.
एक्सएमएल फाइल आणि शेअर कोडसाठी आपण आधारच्या वेबसाइट https://resident.uidai.gov.in/offline-kyc वर जाऊन आपले ऑफलाइन ई-आधार डाउनलोड करू शकता.
यावेळी एक्सएमएल फाईल आणि शेअर कोड दोन्ही डाउनलोड केले जातील. वर उल्लेख केलेल्या ठिकाणी त्यांचा वापर करावा.
आता आणखी एक फॉर्म येईल ज्यामध्ये आपल्याला काही वैयक्तिक माहिती द्यावी लागेल.
हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर यूजर आयडी आणि पासवर्ड येईल.
याद्वारे आपण Aadhaar Testing and Certification पोर्टलवर लॉग इन करू शकाल.
त्यानंतर Continue बटणावर क्लिक करा.
आता एक फॉर्म समोर येईल, त्यामध्ये विचारलेली माहिती योग्यरित्या भरा.
हा फॉर्म भरल्यानंतर तुमचा फोटो आणि सही अपलोड करावी लागेल.
आता तुम्हाला प्रिव्ह्यू ऑप्शन दिसेल. यामध्ये तुम्ही फॉर्ममध्ये दिलेली माहिती बरोबर आहे की नाही हे याची खात्री करून घ्या.
आता Proceed to submit form वर क्लिक करा.
आता पेमेंट करावे लागेल:
ही सर्व प्रक्रिया केल्यावर आपल्याला पेमेंट करावे लागेल. पेमेंट केल्यानंतर साइटच्या मेनूवर जा आणि पेमेंट (Payment) ऑप्शनवर क्लिक करा. आता आपले बँक खाते निवडा. त्यानंतर Please Click Here to generate receipt वर क्लिक करा. तिथून तुम्हाला चालन पावती डाउनलोड करून ती प्रिंट करावी लागेल.
केंद्र बुक करावे लागेल :
सर्व माहिती भरल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर 1 ते 2 दिवसांनंतर वेबसाइटवर परत लॉग इन करा आणि Book Center वर क्लिक करा. इथं आपल्या जवळचे कोणतेही केंद्र निवडा. तुम्हाला या केंद्रावर आधार परीक्षा द्यावी लागेल. तारीख आणि वेळ निवडा आणि फॉर्म सबमिट करा. यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला प्रवेशपत्र (Admit Card) मिळेल. हे प्रवेश पत्र डाउनलोड करून प्रिंट करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card, Money