जाहिरात
मराठी बातम्या / मनी / LIC : या योजनेत केवळ एकदा प्रीमियम भरा आणि आयुष्यभर दरमहा 12000 रुपये पेन्शन मिळवा, जाणून घ्या काय आहेत फायदे

LIC : या योजनेत केवळ एकदा प्रीमियम भरा आणि आयुष्यभर दरमहा 12000 रुपये पेन्शन मिळवा, जाणून घ्या काय आहेत फायदे

LIC : या योजनेत केवळ एकदा प्रीमियम भरा आणि आयुष्यभर दरमहा 12000 रुपये पेन्शन मिळवा, जाणून घ्या काय आहेत फायदे

LIC च्या या योजनेत केवळ एकदा प्रीमियम द्यावा लागेल. त्यानंतर 60 वर्षानंतर दर महिन्याला 1000 रुपयांपासून ते 12000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात LIC ने सरल पेन्शन योजना (Saral Pension)  सुरू केली आहे. तुम्हीही या सरल पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकता. LIC च्या या योजनेत केवळ एकदा प्रीमियम द्यावा लागेल. त्यानंतर 60 वर्षानंतर दर महिन्याला 1000 रुपयांपासून ते 12000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकतं. हे पेन्शनचे पैसे ग्राहकाला आयुष्यभर मिळतील. LIC सरल पेन्शन योजनेच्या दोन पद्धती आहेत. पहिली Life Annuity with 100 percent return of purchase price. हे पेन्शन सिंगल लाईफसाठी आहे. म्हणजेच ही पेन्शन योजना एकाच व्यक्तीशी जोडलेली असेल. पेन्शनधारी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत त्यांना हे पेन्शन मिळत राहील. त्यानंतर नॉमिनीला बेस प्रीमियम मिळतो. दुसरी पेन्शन योजना जॉईंट लाईफसाठी आहे. यात पेन्शन पती-पत्नी दोघांना मिळतं. यात पेन्शन योजनेनुसार, दोघांपैकी जो कोणी जिवित असेल, त्याला पेन्शन मिळत राहील. ज्यावेळी दोघेही जिवित नसतील, त्यानंतर नॉमिनीला बेस प्राईस मिळेल.

नोकर, ड्रायव्हर किंवा भाडेकरूचं Aadhaar व्हेरिफाय करणं आवश्यक, ही आहे प्रक्रिया

- विमाधारकासाठी पॉलिसी घेतल्यापासून त्यांचं पेन्शन सुरू होईल. - पेन्शन दर महिन्याला, तिमाही, सहा महिन्याला किंवा वर्षाला यापैकी कसं मिळावं हे विमाधारक स्वत: ठरवू शकतो. महिन्याला तुमच्या गुंतवणुकीच्या आधारे 1000 रुपयांपासून 12000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकतं. - ही पेन्शन योजना ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने घेता येते. - या योजनेत 12000 रुपये वर्षाला अशी कमीत-कमी रक्कम लावावी लागेल. तसंच यात अधिकाधिक कितीही रक्कम लावता येऊ शकते. - ही योजना 40 ते 80 वर्षापर्यंतच्या लोकांसाठी आहे. - या योजनेत पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेपासून 6 महिन्यानंतर पॉलिसी होल्डरला कोणत्याही वेळी कर्ज मिळू शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात