• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • तुमच्या कामाची बातमी! दररोज 416 रुपयांची गुंतवणूक करुन मिळवू शकता 1 कोटी, जाणून घ्या डिटेल्स

तुमच्या कामाची बातमी! दररोज 416 रुपयांची गुंतवणूक करुन मिळवू शकता 1 कोटी, जाणून घ्या डिटेल्स

एक अशी बचत योजना आहे, ज्यात कमी गुंतवणूक करुन कोट्यवधींचा फंड तयार करता येतो. पब्लिक प्रॉविडेंट फंट (PPF) ही योजना त्यापैकीच एक स्मॉल सेव्हिंग स्किम (Small Savings scheme) आहे. तसंच यात कोणतीही जोखिमही राहत नाही.

 • Share this:
  नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : कोरोना काळात सेव्हिंगबाबत अधिक जागरुकता निर्माण झाली आहे. दर महिन्याला, दर दिवसाला केलेली छोटी गुंतवणूक काही वर्षात मोठी रक्कम तयार होते. अनेक जण कमी गुंतवणुकीतून चांगले रिटर्न्स मिळणाऱ्या बचत योजनांच्या शोधात असतात. एक अशी बचत योजना आहे, ज्यात कमी गुंतवणूक करुन कोट्यवधींचा फंड तयार करता येतो. पब्लिक प्रॉविडेंट फंट (PPF) ही योजना त्यापैकीच एक स्मॉल सेव्हिंग स्किम (Small Savings scheme) आहे. तसंच यात कोणतीही जोखिमही राहत नाही. केंद्र सरकारने सप्टेंबर तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांच्या (Small Savings) व्याज दरात कोणतेही बदल केलेले नाही. अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) इकोनॉमिक अफेयर्स डिपार्टमेंटला दिलेल्या माहितीनुसार, 2020-21 च्या दुसऱ्या तिमाही म्हणजेच 1 जुलै ते 30 सप्टेंबर कालावधीत विविध स्मॉल सेव्हिंग स्किमच्या व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचं सांगितलं. सध्या PPF खात्यात 7.1 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. PPF Account 15 वर्षांनंतर मॅच्युअर होतं. यात दर 5 वर्षांनी वाढ करता येते. कसे मिळतील 1 कोटी रुपये? जर तुम्ही एका वर्षात जवळपास 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करत असाल, म्हणजेच महिन्याला 12,500 रुपये गुंतवत असाल, तर तुम्ही ही रक्कम 1 कोटी रुपयांत बदलू शकता. सध्या सरकार PPF खात्यावर 7.1 टक्के वार्षिक व्याज देते. या योजनेत गुंतवणूक कमीत-कमी 15 वर्षासाठी केली जाते. जर तुम्ही 15 वर्ष दर महिन्याला 12,500 रुपयांची गुंतवणूक करत असाल, तर ही रक्कम मॅच्युरिटीवेळी 40,68,209 रुपये होईल. एकूण गुंतवणूक 22.5 लाख रुपये आणि व्याज 18,18,209 रुपये होईल.

  LIC : या योजनेत केवळ एकदा प्रीमियम भरा आणि आयुष्यभर दरमहा 12000 रुपये पेन्शन मिळवा, जाणून घ्या काय आहेत फायदे

  कोट्यवधींची रक्कम मिळवण्यासाठी PPF Scheme मधून पैसे काढण्याऐवजी दरवर्षी गुंतवणूक सुरू ठेवू शकता. 15 वर्षानंतरही 5-5 वर्ष गुंतवणूक वाढवता येते. मॅच्युरिटी झाल्यानंतर पाच वर्षांनी तुमची गुंतवणूक 66,58,288 रुपये होईल. पुढील पाच वर्षात हा आकडा कोट्यवधी रुपयांजवळ जाईल. म्हणजेच तुम्ही सलग 25 वर्ष दर महिन्याला 12,500 रुपये रुपयांची गुंतवणूक करत असाल, तर तुम्ही 1,03,08,015 रुपयांची मोठी रक्कम रिटर्न मिळवू शकता. म्हणजेच रोज 416 रुपयांची गुंतवणूक करुन PPF द्वारे तुम्ही 25 वर्षात करोडपती बनू शकता.
  Published by:Karishma
  First published: