बापरे! याठिकाणी सापडलं 99 टन सोनं, वाचा किती अब्ज डॉलर्सचा आहे हा ऐवज

बापरे! याठिकाणी सापडलं 99 टन सोनं, वाचा किती अब्ज डॉलर्सचा आहे हा ऐवज

तुर्कस्तानात (Turkey) 99 टन सोनं सापडलं असून याची किंमत वाचून तुम्ही थक्क व्हाल. ही किंमत जगातील अनेक देशांच्या जीडीपी पेक्षाही जास्त आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 डिसेंबर:  तुर्कस्तानात 99 टन सोनं सापडलं असून याची किंमत वाचून तुम्ही थक्क व्हाल. ही किंमत जगातील अनेक देशांच्या जीडीपी पेक्षाही जास्त आहे. सोन्याच्या या मोठ्या खाणीचा शोध Fahrettin Poyraz या व्यक्तीस लागला आहे. पॉयराझ तुर्कस्तानातील अॅग्रीकल्चर क्रेडिट कोऑपरेटिव्ह्सचे (Agricultural Credit Cooperatives) प्रमुख आहेत. पॉयराझ यांनी एका स्थानिक वृत्तसंस्थेशी बोलताना अशी माहिती दिली आहे की या 99 टन सोन्यापैकी काही हिस्सा दोन वर्षामध्ये काढण्यात यश येईल. यामुळे तुर्कस्तानाच्या अर्थव्यवस्थेला (Turkey Economy) मोठी आर्थिक मदत होणार आहे. या शोध लागलेल्या 99 टन सोन्याची किंमत 6 अब्ज  डॉलरपेक्षाही जास्त आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

यावर्षी तुर्कस्तानात 38 टन सोन्याचं उत्पादन

यावर्षी तुर्कस्तानात होणाऱ्या सोन्याच्या उत्पादनाने (Gold production in Turkey) त्यांचाच रेकॉर्ड तोडला आहे. 2020 या वर्षात तुर्कस्तानात 38 टन सोन्याचे उत्पादन करण्यात आले. तुर्कस्तानचे ऊर्जामंत्री फेथ डॉमनेझ (Faith Donmez) यांनी सप्टेंबर महिन्यामध्येच असं लक्ष्य ठेवलं होतं की, तुर्कस्तानला एकूण 100 टन सोन्याचे उत्पादन करायचे आहे.

(हे वाचा-स्वस्त सोनेखरेदीची वर्षातील शेवटची संधी, ऑनलाइन पेमेंटवर अतिरिक्त डिस्काउंट)

अनेक देशांच्या जीडीपी पेक्षाही जास्त आहे किंमत

तुर्कस्तानमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणेत सोन्याबाबत माहित झाले आहे. या खाणीत सापडलेल्या सोन्याची किंमत 6 अब्ज डॉलरपेक्षाही जास्त आहे. अर्थात अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा ही किंमत जास्त आहे. उदाहरणार्थ मालदीवचा जीडीपी 4.87 अब्ज डॉलर आहे. बुरुंडी, बारबाडोस, गुयाना, मॉन्टेनेगरो, मॉरिशियाना या देशांचा जीडीपीही 6 अब्ज डॉलरपेक्षा खूप कमी आहे.

(हे वाचा-कर चुकवण्याला बसणार आळा! मोदी सरकारने या करदात्यांसाठी बनवला नवा नियम)

दुसरीकडे सीरियामधून तुर्कस्तानात येणाऱ्या निर्वासितांना मदत करण्यासाठी यूरोपियन यूनियन 590 मिलियन डॉलरची मदत करण्याची तयारी करत आहे. EU कडून साधारण 18 लाख निर्वासितांना आवश्यक रक्कम देण्यात येणार आहे आणि 7 लाखांहून अधिक मुलांना शिक्षण देण्याचीही मदत केली जाणार आहे. रेड क्रिसेन्ट ऑफ टर्की हा कार्यक्रम सांभाळत आहे. युनिसेफ आणि रेडक्रॉसही यात सहभागी होत आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 25, 2020, 12:33 PM IST
Tags: gold

ताज्या बातम्या