नवी दिल्ली, 17 जुलै : पॅन कार्ड एक महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे. पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्याची अखेरची तारीख 30 जून 2023 होती. सरकारने ही तारीख पुढे वाढवलेली नाही. अशा वेळी ज्या लोकांचा पॅन-आधार लिंक होऊ शकला नाही, त्यांचा पॅन कार्ड निष्क्रिय झाला आहे. एकदा पॅन कार्ड निष्क्रिय केल्यानंतर तुम्ही अनेक फायनेंशियल ट्रांझेक्शन करू शकत नाही. मात्र पॅन निष्क्रिय झाले असले तरी काही आर्थिक व्यवहार करता येतात. मात्र, या व्यवहारांमध्ये TDS आणि TCS वजावट जास्त असेल.
निष्क्रिय पॅन कार्डने करता येतात हे ट्रांझेक्शन -पॅन निष्क्रिय असले तरीही तुम्हाला बँक एफडीवर व्याज मिळेल. एफडी आणि आरडीकडून मिळणारे -वार्षिक व्याज 40 हजार रुपयांपर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 50 हजार रुपयांपर्यंत घेतले जाऊ शकते. -एका आर्थिक वर्षात कंपनी आणि म्युच्युअल फंडांकडून 5 हजार रुपयांपेक्षा जास्त डिव्हिडेंड घेतला जाऊ शकतो. -विक्री किंमत किंवा मुद्रांक शुल्क मूल्य प्रति व्यवहार रुपये 50 लाखांपेक्षा जास्त असल्यास स्थावर मालमत्ता विकता येते. -10 लाख रुपयांच्या वरची कार खरेदी करणे. -ईपीएफ अकाउटं मधून 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढणे. -घरमालकाला महिन्याला 50,000 रुपयांपेक्षा जास्त भाडे देणे. -जर व्यवहार 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही वस्तू आणि सर्व्हिस विकू शकता. -कंत्राटी कामांसाठी रु. 30,000 किंवा रु. 1 लाखापेक्षा जास्त पेमेंट करणे. -15,000 रुपयांपेक्षा जास्त कमिशन किंवा ब्रोकरेजचं पेमेंट करणे.