मराठी बातम्या /बातम्या /मनी /

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! DA मिळाल्यानंतर तुमच्या पगारावर कसा होणार फिटमेंट फॅक्टरचा परिणाम, वाचा सविस्तर

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! DA मिळाल्यानंतर तुमच्या पगारावर कसा होणार फिटमेंट फॅक्टरचा परिणाम, वाचा सविस्तर

जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये हा भत्ता ट्रान्सफर केला जाऊ शकतो. हा महागाई भत्ता सातव्या वेतन आयोगा (7th pay Commission) अंतर्गत देण्यात येणार आहे.

जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये हा भत्ता ट्रान्सफर केला जाऊ शकतो. हा महागाई भत्ता सातव्या वेतन आयोगा (7th pay Commission) अंतर्गत देण्यात येणार आहे.

जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये हा भत्ता ट्रान्सफर केला जाऊ शकतो. हा महागाई भत्ता सातव्या वेतन आयोगा (7th pay Commission) अंतर्गत देण्यात येणार आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 11 जून: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Govt Employee) महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने कोरोना काळात महागाई भत्ता (Dearness Allowance) थांबवला होता. मात्र आता लवकरात लवकर महागाई भत्ता देण्याची योजना आखली जात आहे. जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात महागाई भत्ता ट्रान्सफर केला जाण्याची शक्यता आहे.  हा महागाई भत्ता सातव्या वेतन आयोगा (7th pay Commission) अंतर्गत देण्यात येणार आहे. महागाई भत्ता देण्यादरम्यान एक महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे फिटमेंट फॅक्टर (fitment factor).

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार निश्चित करण्यासाठी फिटमेंट फॅक्टर  (7th CPC fitment factor) अत्यंत महत्त्वाचा आहे. फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची किमान सॅलरी 6000 रुपयांवरुन थेट 18000 रुपयांवर पोहोचली आहे.

3 हप्ते थकित

केंद्र सरकारकडे कर्मचाऱ्यांच्या डीएचे तीन हप्ते थकित आहेत, ज्याचं देय लवकरच केंद्र सरकारकडून केलं जाणार आहे. कर्मचारी आणि पेन्शनर्सचे 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 चे डीए आणि डीआर प्रलंबित आहेत. डीएच्या तीन हप्त्यांचं देय केंद्र सरकारने 30 जून 2021 पर्यंत फ्रीझ केलं आहे.

हे वाचा-ग्राहकांना झटका! दुसऱ्या बँकेच्या ATMमधून पैसे काढणं महागणार,RBI वाढवलं हे शुल्क

उदाहरणातून समजून घ्या

सातवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल. शिव गोपाळ मिश्रा यांनी एका उदाहरणातून असे सांगितले आहे की, जर केंद्रीय कर्मचाऱ्याचा मासिक पगार 20000 रुपये असेल तर नवीन नियम लागू झाल्यानंतर त्याचे मासिक वेतन 51,400 (20000x2.57) होईल. यानंतर डीए, टीए, मेडिकल रिएम्बर्समेंट यासारख्या भत्त्यांची गणना केली जाईल. यानंतर मंथली बेसिक पे आणि एकूण भत्ते मिळून कर्मचाऱ्याला दर महिन्याला मिळणारा पगार दिला जाईल.

त्यांनी अशी माहिती दिली की कोणत्याही कर्मचाऱ्याच्या एकूण पगाराच्या जवळपास 50 टक्के बेसिक सॅलरी असते. अशाप्रकारे जर एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी 20 हजार रुपये आहे तर त्याची ग्रॉस मंथली सॅलरी जवळपास 1,02,800 (51,400x2) रुपये होईल.

यानंतर पगारातून मासिक पीएफ योगदान, सोर्सवर इन्कम टॅक्स इत्यादीची कपात केली जाईल. त्यानंतर कर्मचाऱ्याला मिळणारी इनहँड सॅलरी निर्धारित केली जाईल.

हे वाचा-LPG ग्राहकांना दिलासा! सिलेंडर रिफील कुणाकडून करायचा हे तुम्ही ठरवणार

फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?

सातव्या वेतन आयोगातील शिफारसींच्या मते, फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार निश्चित करताना महागाई भत्ता, प्रवास भत्ता, हाउस रेंट अलाउन्स या भत्त्यांव्यतिरिक्त बेसिक सॅलरीला सातव्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टर 2.57 ने गुणाकार काढून काढला जातो.

First published:

Tags: Dearness allowance, Money