बँक ग्राहकांना मोठा झटका! दुसऱ्या बँकेच्या ATM मधून पैसे काढणं महागणार, RBI ने या शुल्कात केली वाढ

बँक ग्राहकांना मोठा झटका! दुसऱ्या बँकेच्या ATM मधून पैसे काढणं महागणार, RBI ने या शुल्कात केली वाढ

ATM Interchange Fees: कोणताही बँक ग्राहक त्याच्या बँकेच्या एटीएममधून दरमहिन्याला 5 वेळा विनाशुल्क पैसे काढू शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम इंटरचेंज फीमध्ये वाढ केली आहे. जाणून घ्या याचा ग्राहकांवर काय परिणाम होईल

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जून: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) 10 जून 2021 रोजी कोणत्याही दुसऱ्या बँकेच्या एटीएमच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर लागू होणारी इंटरचेंज फीस (ATM Interchange Fees) 15 रुपयांवरुन 17 रुपये केली आहे. कोणत्याही बँक ग्राहकाला (Bank Customer) दरमहा मिळणाऱ्या  फ्री एटीएम ट्रांझॅक्‍शन (Free ATM Transaction) नंतर ग्राहकांना द्यावा लागणाऱ्या ग्राहक शुल्काची कमाल मर्यादा देखील (Customer Charges Ceiling) 20 रुपयांवरुन वाढवून 21 रुपये करण्यात आली आहे. इंटरचेंड फीजमध्ये करण्यात आलेली वाढ 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे.

काय आहे इंटरचेंज फीज आणि कशाप्रकारे हे शुल्क प्रभावी ठरते?

जर 'ए' बँकेच्या ग्राहकाने 'बी'च्या एटीएममधून त्याच्या कार्डचा वापर करत पैसे काढले, तर बँक 'A' ला दुसऱ्या बँकेला एक सुनिश्चित शुल्क द्यावे लागते. या शुल्काला इंटरचेंज फीज असं म्हणतात. अनेक वर्षांपासून खाजगी बँका आणि व्हाइट लेबल एटीएम ऑपरेटर्स इंटरचेंज फीज वाढवून 15 रुपयांवरुन 18 रुपये करण्याची मागणी करत होते.

हे वाचा-'हे' प्रसिद्ध अब्जाधीश भरतायंत अत्यल्प टॅक्स, अहवालामध्ये धक्कादायक खुलासा

थोडक्यात सांगायचं झालं तर याचा परिणाम थेट ग्राहकांवर होणार आहे. तुम्हाला मिळालेल्या फ्री लिमिटनंतर द्याव्या लागणाऱ्या शुल्कामध्येच ही वाढ झाली आहे. त्यामुळे या मर्यादेनंतर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढणं काहीसं महागणार आहे. भारतीय बँकांच्या संघटनेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जून 2019 गठित करण्यात आलेल्या समितीच्या शिफारसीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

RBI ने का वाढवली इंटरचेंज फीज

रिझर्व्ह बँकेने अशी माहिती दिली आहे की याआधी ऑगस्ट 2012 मध्ये इंटरचेंज फीजमध्ये बदल करण्यात आला होता. तर ग्राहकांवर आकरण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये 2014 मध्ये बदल करण्यात आला होता. अशावेळी समितीच्या शिफारसीनंतरच इंटरचेंज फीज आणि कस्टमर चार्जेस वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचा-पुन्हा सोन्याच्या दरात घसरण, चांदीची झळाळीही उतरली; हे आहेत मुख्य शहरातील भाव

आरबीआयने अशी माहिती दिली की, बँक आणि एटीएम ऑपरेटरवर एटीएम डिप्लॉयमेंटसाठी होणारा खर्च आणि देखभाल खर्चासह सर्व भागधारक आणि ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. RBI ने आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही व्यवहारांसाठी इंटरचेंज फी वाढविली आहे. केंद्रीय बँकेने गैर-आर्थिक व्यवहारासाठी फी 5 रुपयांवरून 6 रुपये केली आहे, जे 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होईल. हा आदेश कॅश रीसायकलर मशीनद्वारे केलेल्या व्यवहारांनाही लागू असेल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: June 11, 2021, 7:49 AM IST

ताज्या बातम्या