मराठी बातम्या /बातम्या /मनी /नोकरी बदलताना Salary Slip आवश्यक, आणखीही अनेक कामासाठी आवश्यक आहे हा दस्तावेज; वाचा सविस्तर

नोकरी बदलताना Salary Slip आवश्यक, आणखीही अनेक कामासाठी आवश्यक आहे हा दस्तावेज; वाचा सविस्तर

ऑफिसच्या सिस्टिममध्ये ही Salary Slip तुम्हाला मिळेल किंवा कंपनीकडून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. नोकरी बदलताना हा दस्तावेज अत्यंत आवश्यक आहे. दरम्यान याशिवायही ही सॅलरी स्लिपचे (Importance of Salary Slip) गरजेची आहे.

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर: प्रत्येक नोकरदार माणून दर महिन्याला एका महत्त्वाच्या मेसेजची वाट पाहत असतो. तो मेसेज म्हणजे पगार क्रेडिट (Salary Credit SMS) झाल्याचा मेसेज. हा पगार जमा झाल्यानंतर मेसेज वाचण्याशिवाय आणखी एक गोष्ट तपासणे महत्त्वाचे आहे. हा दस्तावेज म्हणजे Salary Slip.ऑफिसच्या सिस्टिममध्ये ही Salary Slip तुम्हाला मिळेल किंवा कंपनीकडून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. नोकरी बदलताना हा दस्तावेज अत्यंत आवश्यक आहे. दरम्यान याशिवायही ही सॅलरी स्लिपचे (Importance of Salary Slip) गरजेची आहे.

सॅलरी स्लिप तपासून घेणं का आवश्यक आहे?

सॅलरी स्लिप आल्यानंतर ती तपासून घेणं आवश्यक आहे. कारण काहीवेळा तुम्हाला क्रेडिट झालेल्या पगारामध्ये कमी असू शकते. तुमच्या मासिक पगाराचा संपूर्ण तपशील तुमच्या या स्लिपवर असतो. ही स्लिप पाहून तुम्हाला समजेल की तुमचं मूळ वेतन किती आहे आणि किती कपात झाली आहे. जर तुमचा पगार कापण्यात आला असेल तर हे या दस्तावेजाच्या आधारे समजेल. जर कपात चुकीच्या ठिकाणी झाली असेल तर तुम्ही त्याबाबत सवाल उपस्थित करू शकता.

1ऑक्टोबरपासून बदलणार महत्त्वाचे आर्थिक बदल, LPG ते ऑटो डेबिटचे नियम बदलणार

नवी नोकरी शोधताना Salary Slip महत्त्वाची

जर तुम्हाला नोकरी बदलायची आहे, तर या जॉबमध्ये तुम्हाला किती पगार मिळतो हे जाणून घेण्याासाठी सॅलरी स्लिप आवश्यक आहे. याआधारेच नोकरी देणाऱ्या कंपनीला तुम्हाला किती सॅलरी ऑफर करायची याचा अंदाज येतो. शिवाय तुम्ही नव्या नोकरीच्या ठिकाणी या सॅलरी स्लिपच्या साहाय्याने पगारासाठी वाटाघाटी करू शकता.

कर्जासाठी अर्ज करताना Salary Slip आवश्यक

तुम्ही कर्जासाठी अर्ज करत असाल तर Salary Slip आवश्यक आहे. प्रमाण म्हणून Salary Slipचा वापर केला जाईल. तुम्ही कर्ज फेडण्यासाठी सक्षम आहात का हे यावरून समजते. तसंच उत्पन्नाचं स्त्रोत म्हणून देखील सॅलरी स्लिप प्रमाण आहे.

RBIने ठोठावला या महत्त्वाच्या बँकेवर 2 कोटींचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

क्रेडिट कार्ड घेण्यासाठी आवश्यक

जर तुम्हाला नवीन क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल, तर तुमची वेतन स्लिप एक आवश्यक दस्तावेज आहे. तुम्हाला किती क्रेडिट मर्यादेपर्यंत तुम्हाला कार्ड जारी केले जाऊ शकते, हे बँका तुमच्या पगाराची स्लिप पाहून ठरवतात.

First published:
top videos

    Tags: Money, Salary