Home /News /money /

Nykaa IPO ला देखील SEBI ची मंजुरी! 4000 कोटींचा फंड उभारणार कंपनी, कमाईची संधी

Nykaa IPO ला देखील SEBI ची मंजुरी! 4000 कोटींचा फंड उभारणार कंपनी, कमाईची संधी

ऑनलाइन ब्युटी रिटेल स्टार्टअप नायकाच्या आयपीओला (Nykaa IPO) भांडवली बाजार नियामक सेबीने मंजुरी दिली आहे. या IPO च्या माध्यमातून 4,000 कोटी रुपये उभारण्याची Nykaa ची योजना आहे.

    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर: गेल्या काही महिन्यात अनेक दिग्गज कंपन्यांचे आयपीओ बाजारात आले आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्यात. आता आणखी एक संधी तुम्हाला मिळणार आहे. ऑनलाइन ब्युटी रिटेल स्टार्टअप नायकाच्या आयपीओला (Nykaa IPO Update) भांडवली बाजार नियामक सेबीने (SEBI approved Nykaa IPO) मंजुरी दिली आहे. या IPO च्या माध्यमातून 4,000 कोटी रुपये उभारण्याची Nykaa ची योजना आहे. या IPO साठी Nykaa चे मूल्यांकन 40,000 कोटी रुपये असू शकते. Nykaa या IPO मध्ये नवीन इश्यूद्वारे 525 कोटी रुपये गोळा करेल. याशिवाय या IPO मध्ये 4.31 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) देखील असतील. IPO मधून उभारल्या जाणाऱ्या 4,000 कोटी रुपयांपैकी अधिकतर फंडचा वपार Nykaa त्यांची भागीदारी विकणाऱ्या विद्यमान भागधारकांना पेमेंट करण्यासाठी वापरतील. फायद्यात आहे हे यूनिकॉर्न आयपीओद्वारे संजय नायर, टीपीजी (TPG), लाइटहाऊस  (Lighthouse) आणि सुनील मुंजाल (Sunil Munjal) यांसारखे भागधारक नायका मधील त्यांचे भाग विकतील. Nykaa हा एक प्रकारचा स्टार्टअप आहे, जो IPO मार्केटमध्ये पाऊल टाकणार आहे. आतापर्यंत आयपीओ आणणारा हा पहिला युनिकॉर्न आहे, जो नफ्यात चालू आहे. याशिवाय, ही देशातील एकमेव नवीन पिढीची कंपनी आहे, ज्याचे मूल्यांकन अब्ज डॉलर्स असूनही, त्यात प्रमोटर समूहाचा हिस्सा अर्ध्याहून अधिक आहे. हे वाचा-SBI WECARE: खास ग्राहकांना FD वर मिळेल 0.80% जास्त व्याज, मार्च 2022 पर्यंत संधी काय आहे या कंपनीचं काम? Nykaa ची स्थापना 2012 मध्ये  माजी गुंतवणूक बँकर फाल्गुनी नायर यांनी केली होती. कंपनी सौंदर्य उत्पादने विकते. ऑनलाइन विक्री व्यतिरिक्त, कंपनी किरकोळ दुकानांद्वारे सौंदर्य उत्पादने विकते. त्याच्या गुंतवणूकदारांमध्ये टीपीजी आणि फिडेलिटी सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांचाही समावेश आहे. Nykaa च्या पोर्टफोलिओमध्ये 1500 हून अधिक ब्रँड समाविष्ट आहेत. यात बॉबी ब्राउन, लॉकिटेन आणि एस्टी लॉडर (Bobbi Brown, Loccitane and Estee Lauder) सारखी मोठी नावे आहेत. कंपनीची देशभरात 68 स्टोअर्स आहेत. आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीचे उत्पन्न 1,860 कोटी रुपये आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या