मुंबई, 16 ऑगस्ट: जून महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government Employees) मोदी सरकारकडून गिफ्ट्स मिळाली आहेत. महागाई भत्ता (Dearness allowance-DA) को 1 जुलैपासून वाढवण्यात आला असून, HRA (House rent Allowance) देखील रिव्हाइज करण्यात आला आहे. सरकारने जुलै महिन्यात महागाई भत्त्यामध्ये 17 टक्क्यांची वाढ करून 28 टक्के केला होता. दरम्यान सरकारने गेल्या दीड वर्षामध्ये फ्रीझ केलेल्या डीए एरिअरचं काय होणार असा सवाल उपस्थित होत आहे. सरकारने असं म्हटलं की जून 2021 पर्यंत डीए एरिअर फ्रीज केले आहे.
DA एरिअरबाबत सरकारने काय म्हटलं?
नॅशनल काउन्सिल ऑफ JCM चे सचिव (स्टाफ साइड) शिवगोपाल मिश्रा यांनी महागाई भत्ता वाढल्याबाबत आनंद व्यक्त केला आहे, मात्र एरिअरबाबत अद्याप निश्चितता नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी असे म्हटले की दीड वर्षांचा डीए अद्याप देण्यात आलेला नाही. अद्याप सरकारशी याबाबत बोलणं सुरू आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की कर्मचाऱ्यांची मागणी पाहता अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे सरकार एरिअर देईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांची मदत होईल असा मध्यवर्ती मार्ग शोधला जाईल.
हे वाचा-3 वर्षांच्या Fixed Deposit वर मिळेल 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, वाचा सविस्तर
1 जुलैपासून DA मध्ये वाढ
मोदी सरकारने 1 जुलैपासून DA मध्ये वाढ करत 28 टक्के केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जुलै रोजी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलतीत (DR) 11 टक्क्यांची वाढ करण्यासाठी मंजुरी दिली होती. ज्यामुळे केंद्र सरकारच्या 48 लाख कर्मचाऱ्यांना आणि 65 लाख पेन्शनधारकांना फायदा झाला आहे. आता DA चे नवे दर 17 टक्क्यांवरुन 28 टक्क्यांवर पोहोचले आहेत.
हे वाचा-EPFO खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी, हे काम पूर्ण नसल्यास अडकतील पैसे
दीड वर्षापासून मिळाला नाही आहे एरिअर
गेल्यावर्षी एप्रिल मध्ये अर्थ मंत्रालयाने COVID-19 पँडेमिकमुळे 30 जून 2021 पर्यंत महागाई भत्ता रोखण्यात आला होता. 1 जानेवारी 2020 पासून 30 जून 2021 पर्यंत डीएचे दर 17 टक्के होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money