जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 3 वर्षांच्या Fixed Deposit वर मिळेल 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, वाचा सविस्तर

3 वर्षांच्या Fixed Deposit वर मिळेल 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, वाचा सविस्तर

Fixed deposit

Fixed deposit

बँकांकडून 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडीची सुविधा दिली जाते. अशावेळी तुम्ही कोणत्या बँकेत एफडी काढायची असा विचार करत असाल तर डीसीबी बँक (DCB Bank) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट: जर तुमचा देखील फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. एफडीमध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित आणि कमी जोखीम असणारी आहे. बँकांकडून 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडीची सुविधा दिली जाते. अशावेळी तुम्ही कोणत्या बँकेत एफडी काढायची असा विचार करत असाल तर डीसीबी बँक (DCB Bank) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. बँक 3 वर्षांसाठीच्या एफडीवर 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज दर देत आहे. तुम्ही देखील या एफडी स्कीमचा फायदा घेऊ शकता. तुम्ही एफडीवरील जास्त व्याजदराचा फायदा 16 ऑगस्टपर्यंत मिळवू शकता. यानंतर फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्हाला सामान्य दराने व्याज मिळेल. जाणून घ्या काय आहे गुंतवणुकीची प्रक्रिया किती मिळेल व्याज? या कालावधीसाठी देशातील विविध बँका 6.25 टक्क्यांपर्यंत व्याज देतात. अशावेळी डीसीबी बँकेची ऑफर फायद्याची ठरेल. कारण डीसीबी बँकेत तुम्हाला 3 वर्षांच्या एफडीवर 7.11 टक्के दराने व्याज मिळेल. हे वाचा- Petrol Price: याठिकाणी 3 रुपये प्रति लीटरनं स्वस्त झालं पेट्रोल,काय आहेत आजचे दर ऑनलाइन काढता येईल FD तुम्ही ऑनलाइन देखील ही एफडी काढू शकता. याकरता तुम्हाला बँकेच्या चकरा मारण्याची आवश्यकता नाही. शिवाय तुमचे बँकेत बचत खाते नसेल तरी देखील तुम्ही या एफडी योजनेचा फायदा घेऊ शकता. मे मध्ये बदलले व्याजदर डीसीबी बँकेच्या व्याजदरात मे महिन्यात बदल करण्यात आला होता. 7 ते 14 दिवसांनी मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर व्याजदर 4.55 टक्के आहे. तर 91 दिवस ते 6 महिन्यापर्यंत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 5.25 टक्के दराने व्याज मिळेल. तर 6 महिने तरे 12 महिन्यांसाठीच्या एफडीसाठी 5.70 टक्के दराने व्याज मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात