मराठी बातम्या /बातम्या /मनी /

7th Pay Commission: कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! सप्टेंबरमध्ये मिळणार वाढलेला पगार

7th Pay Commission: कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! सप्टेंबरमध्ये मिळणार वाढलेला पगार

7th Pay Commission: कोट्यवधी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central government employee) आनंदाची बातमी आहे. तुमच्या पगारावर परिणाम करणाऱ्या निर्णयासंदर्भात ही बातमी आहे.

7th Pay Commission: कोट्यवधी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central government employee) आनंदाची बातमी आहे. तुमच्या पगारावर परिणाम करणाऱ्या निर्णयासंदर्भात ही बातमी आहे.

7th Pay Commission: कोट्यवधी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central government employee) आनंदाची बातमी आहे. तुमच्या पगारावर परिणाम करणाऱ्या निर्णयासंदर्भात ही बातमी आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 30 जून: कोट्यवधी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central government employee) आनंदाची बातमी आहे. त्यांना आता सप्टेंबरमध्ये वाढलेला पगार (DA Hike) मिळणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं दावा केला आहे की सरकार जानेवारी आणि जुलै 2020 तसंच जानेवारी 2021 च्या महागाई भत्त्याचा हप्ता, यावर्षीच्या जुलैच्या हप्त्यासह जोडून सप्टेंबरपर्यंत ही रक्कम देण्यास सहमत झालं आहे. म्हणजे आता या कर्मचाऱ्यांना वाढलेला पगार सप्टेंबर महिन्यात मिळेल.

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) रोखण्याचा जो निर्णय घेतला होता, तो आता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पेन्शनर्सना देण्यात येणाऱ्या डीआर वरील थांबण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी सरकार तयार झालं आहे. National council (Staff side) ने याबाबत पत्र जारी करत माहिती दिली आहे.

सप्टेंबर महिन्यात मिळणार डीए

केंद्रीय कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस शिवगोपाल मिश्रा यांनी मंगळवारी सांगितले की 26 आणि 27 जून रोजी नॉर्थ ब्लॉकमध्ये नॅशनल काउन्सिल/जेसीएमची एक बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव तसंच कर्मचारी पक्षाकडून महासचिव म्हणून ते स्वतः (शिवगोपाल मिश्रा) आणि इतर नेते सहभागी झाले होते. या बैठकीत सुमारे 28 महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

हे वाचा-Gold Price Today: 9000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, इथे तपासा प्रति तोळ्याचा भाव

त्यांनी असं म्हटलं की कॅबिनेट सचिव यांच्यासह झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे की, गेल्या दीड वर्षापासून कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे एकूण तीन महागाई भत्त्याचे हप्ते (1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021) फ्रीझ करण्यात आले होते, त्यामध्ये जुलै 2021 चा हप्ता आणि ऑगस्ट 2021 च्या एरियरसह हे संपूर्ण देय सप्टेंबर 2021 मध्ये दिलं जाईल.

हे वाचा-PM Kisan: तुमच्या खात्यातही येतील 4000 रुपये, आजच पूर्ण करा हे महत्त्वाचं काम

किती वाढू शकतो डीए?

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या 17 टक्के डीए मिळतो. अर्थ मंत्रालयाने जून 2021 पर्यंत 50 लाखापेक्षा जास्त केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 61 लाख पेन्शनधारकांच्या डीए आणि डीआरची वाढ थांबवली आहे. जानेवारी 2020 मध्ये डीएमध्ये 4 टक्के वाढ झाली होती. त्यानंतर जून 2020 मध्ये महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढला होता. यानंतर जानेवारीमध्ये डीए 4 टक्के वाढला आहे. आता महागाई भत्ता 28 टक्क्यांच्या दरावर पोहोचला आहे. याचा फायदा या सर्व कर्मचारी आणि पेन्शनर्सना होईल.

First published:

Tags: Central government, Dearness allowance