• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • PM Kisan: तुमच्या खात्यातही येतील 4000 रुपये, आजच पूर्ण करा हे महत्त्वाचं काम

PM Kisan: तुमच्या खात्यातही येतील 4000 रुपये, आजच पूर्ण करा हे महत्त्वाचं काम

PM Kisan Samman Nidhi Scheme: तुम्ही अद्याप नोंदणी केली नसेल तर आजच नोंदणी करा, जेणेकरून तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल. आज नोंदणी केल्यास पीएम किसान योजनेंतर्गत तुमच्या खात्यात 4000 रुपये मिळवण्याची संधी आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 30 जून: मोदी सरकारनं (Modi Government) गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 2019 मध्ये सुरू केलेल्या पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Scheme) देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर वर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. या योजनेअंतर्गत वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवला जातो. प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता असतो. ही योजना दाखल केल्यानंतर अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा यानुसार त्यात वेळोवेळी सरकारनं काही सुधारणाही केल्या आहेत. या योजनेसाठी घरबसल्या ऑनलाइन रजिस्ट्रेशनही करता येते. ग्रामपंचायत सचिव किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर्सद्वारेही या योजनेसाठी अर्ज करू शकता. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता पाठवण्यात आला आहे, मात्र  अद्याप काही शेतकऱ्यांना हा हप्ता  मिळालेला नाही. शिवाय तुम्ही अद्याप नोंदणी केली नसेल तर आजच नोंदणी करा, जेणेकरून तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल. आज नोंदणी केल्यास पीएम किसान योजनेंतर्गत तुमच्या खात्यात 4000 रुपये मिळवण्याची संधी आहे. हे वाचा-1 जुलैपासून या बँका बदलत आहेत महत्त्वाचे नियम, तुमच्यावर होणार थेट परिणाम कसा मिळेल 4000 रुपयांचा लाभ? योजनेत नोंदणी न केल्यानं अनेक शेतकरी दोन हजार रुपयांच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. आता त्यांनी 30 जूनपर्यंत नोंदणी केल्यास आणि ती मंजूर झाल्यास त्यांना एप्रिल-जुलैचा आणि ऑगस्टचा नवा हप्ता असे दोन हप्ते मिळून 4000 रुपये मिळू शकतील. एप्रिल-जुलैचा हप्ता जुलैमध्ये खात्यात जमा होईल. अर्थात दोन्ही हप्त्यांचा लाभ लागोपाठ मिळाला तर तुम्हाला 4000 रुपये मिळू शकतील. कशाप्रकारे कराल नोंदणी? - सर्वात प्रथम तुम्हाला pmkisan.gov.in वेबसाइटवर जावे लागेल. - तिथं फार्मर्स कॉर्नर (Farmers Corner) पर्यायावर क्लिक करा. - आता New Farmer Registration पर्यायावर क्लिक करा. - एक नवीन टॅब (Tab) उघडेल ज्यामध्ये आधार क्रमांक (Aadhaar Number) आणि कॅप्चा कोड भरावा लागेल. - आता तुमची आणि जमिनीची (Farm Land) माहिती द्यावी लागेल. - सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट (Submit) बटणावर क्लिक करा. हे वाचा-ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर! स्पेशल FD स्कीमची डेडलाइन वाढवली, वाचा सविस्तर आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे शेतजमिनीची कागदपत्रे (Farm Land Document) असणे आवश्यक आहे. याशिवाय आधार कार्ड, अपडेटेड बँक खाते, अ‍ॅड्रेस प्रूफ आणि पासपोर्ट साईज फोटो असणं आवश्यक आहे.
First published: