जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PhonePe ने सुद्धा सुरू केली विमा योजना; 149 रुपयांपासूनचे प्लॅन्स, कसे होतील उपलब्ध?

PhonePe ने सुद्धा सुरू केली विमा योजना; 149 रुपयांपासूनचे प्लॅन्स, कसे होतील उपलब्ध?

PhonePe ने सुद्धा सुरू केली विमा योजना; 149 रुपयांपासूनचे प्लॅन्स, कसे होतील उपलब्ध?

फोनपे (PhonePe) या डिजिटल पेमेंट्स कंपनीने ICICI Prudential Life Insurance सहकार्याने आपल्या अॅपमध्ये टर्म लाइफ इन्शुरन्सचे (Term Life Insurance) प्लॅन्स उपलब्ध करून दिले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 6 जानेवारी: कोव्हिड काळात (Covid-19 pandemic) डिजिटल पेमेंट्सचे अनेक पर्याय सामान्यांनी आत्मासात केले आहेत. मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार होऊ लागले. अशा डिजिटल पेमेंटपैकीच एक फोन पे. फोनपे (PhonePe) या डिजिटल पेमेंट्स कंपनीने आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सच्या (ICICI Prudential Life Insurance) सहकार्याने आपल्या अॅपमध्ये टर्म लाइफ इन्शुरन्सचे (Term Life Insurance) प्लॅन्स उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे सध्याच्या कठीण काळात लोकांना टर्म लाइफ इन्शुरन्सचे पर्याय सोप्या पद्धतीने उपलब्ध होतात. या कंपनीने वार्षिक कमीत कमी 149 रुपये एवढ्या कमी हप्त्याचेही प्लॅन्स उपलब्ध करून दिले आहेत. इन्शुरन्सबद्दलच्या जागरूकतेचा अभाव आणि गुंतागुंतीची कागदपत्रे आदींमुळे देशात इन्शुरन्सच्या वापराचं प्रमाण अवघं 2.73 टक्के आहे, असं फोनपेनं म्हटलं आहे. टियर टू सिटीजमध्ये देशातली मोठी लोकसंख्या राहते. या शहरांमध्ये इन्शुरन्सचा वापर मोठ्या प्रमाणावर नाही. म्हणूनच ही दरी भरून काढण्यासाठी फोनपे या डिजिटल पेमेंट कंपनीने पुढाकार घेतला आहे. अभिज्ञा भावेची लगीनघाई : ग्रहमख विधीचे PHOTO सोशल मीडियावर व्हायरल 250 मिलियन अर्थात 25 कोटीहून ग्राहक फोनपेचा वापर करतात. 18 ते 50 वर्षं वयोगटातल्या आणि वार्षिक एक लाख रुपये उत्पन्न असलेल्या फोनपे युझर्सना फोनपेवर अगदी सहजपणे पॉलिसी (Policy) घेणं शक्य होणार आहे. हेल्थ चेक-अपविना या पॉलिसीधारकांना हप्त्याच्या रकमेनुसार एक लाख ते 20 लाख रुपयांपर्यंतचं विमा संरक्षण मिळू शकेल, असा PhonePe चा दावा आहे. ग्राहकांकडे असलेल्या अन्य इन्शुरन्स प्लॅन्सची वैधता वाढवणंही फोनपे अॅपद्वारे शक्य होणार आहे. फोनपेच्या इन्शुरन्स विभागाचे प्रमुख गुंजन घई यांनी सांगितलं, की भौगोलिक परिस्थिती, वय आणि उत्पन्नाचा स्रोत यांचा विचार करता ज्यांना इन्शुरन्सची सर्वांत जास्त गरज असते, त्यांच्यापर्यंत ही प्रॉडक्ट्स पोहोचतच नाहीत. त्यातल्या समस्यांचा अभ्यास करून आम्ही ICICI बरोबर ही भागिदारी केली आहे आणि ती समस्या सोडवू शकू असा आम्हाला विश्वास आहे. आमच्या ग्राहकांनाही त्यांच्या गरजा भागवणारी युनिक उत्पादनं आम्ही या माध्यमातून देऊ शकणार आहोत. So expensive! 5 घटकांसमोर मौल्यवान सोनं, हिरेही कवडीमोल; किंमत वाचूनच थक्क व्हाल अगदी सोप्या काही स्टेप्समध्ये फोनपे ग्राहकांना टर्म लाइफ इन्शुरन्स खरेदी करता येणार आहे. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्हींमधील फोनपे अॅपमध्ये माय मनी या सेक्शनमधील इन्शुरन्स या विभागाला ग्राहकांनी भेट द्यावी. त्यात टर्म लाइफ इन्शुरन्स हा पर्याय निवडून विमा रक्कम निवडावी. सर्वसाधारण माहिती आणि नॉमिनीचं नाव आदी माहिती भरल्यानंतर ग्राहक फोनपेवरच ही खरेदीप्रक्रिया पूर्ण करू शकतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: insurance
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात