मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर रोजी 5G सेवा धुमधडाक्यात लाँच केली. एअरटेल आणि जिओने 8 शहरांमध्ये सध्या ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू केली आहे. यामध्ये नामांकित शहरांचा समावेश आहे. कर्मशिअल सेवा सुरू करण्यात आली आहे. 5G सेवा लाँच करण्याआधी आणि नंतर मोठ्या प्रमाणात 5G फोनची विक्रीही वाढली.
सरकारने आता 5G फोनसाठी सॉफ्टवेअर अपडेट देण्यात यावा यासाठी कंपन्यांवर दबाव आणला आहे. 5G लाँच करण्यात आलं मात्र अजूनही हाय स्पीड सेवा देण्यासाठी तयारी पूर्ण नसल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे. एपल आणि सॅमसंग या दोन कंपन्या प्रामुख्याने यामध्ये सहभागी आहेत. या दोन्ही कंपन्यांच्या सगळ्या फोनमध्ये सध्या 5G सेवा सुरू करण्यात आली नाही.
शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार, या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे
सॅमसंगने आपल्या टीमसोबत बैठक घेऊन याबाबत एक निर्णय जारी केला आहे. आपल्या टीममध्ये त्यांनी नव्याने तयार होणाऱ्या फोनमध्ये 5G सपोर्ट देण्याबाबत निवेदन दिलं आहे. हाय-स्पीड नेटवर्कला सपोर्ट करण्यासाठी सॉफ्टवेअर अपग्रेड रिलीझ करणं गरजेचं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या Apple ने Vivo, Xiaomi Corp तसेच देशांतर्गत टेलिकॉम ऑपरेटर्ससह या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आज सॅमसंगने आपला प्लॅन जारी केला आहे. नोव्हेंबर मिडपर्यंत सॉफ्टवेअरमध्ये अपडेट मिळेल असं सांगण्यात आलं आहे.
#Samsung commits to roll out of #OTA updates across devices by mid-November to enable #5G phones. Samsung’s move follows push by @DoT_India & @GoI_MeitY to handset makers for releasing updates for 5G phones Here's more pic.twitter.com/o68KTyWos8
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) October 12, 2022
कार घेणंही अवाक्याबाहेर होणार; येत्या काळात किंमती गगनाला भिडणार?
एअरटेलच्या वेबसाइटवर मंगळवारी सर्व Apple iPhones चे 12 ते 14 मॉडेल्स त्यांच्या 5G कंपॅटिबल सेक्शन अंतर्गत नॉन-कंपॅटिबल असल्याचं दाखवलं. त्याच वेळी, सॅमसंगचे बरेच मॉडेल देखील या सेवेसाठी तयार नसल्याचं सांगण्यात आलं होतं. एअरटेलने याबाब चिंताही व्यक्त केली होती. यामागे कारण म्हणजे त्यांचे बरेच प्रीमियम ग्राहक हे एपल फोन वापरत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.