मराठी बातम्या /बातम्या /मनी /शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार, या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार, या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

SBI की पोस्ट ऑफिस? FD वर मिळवा10 लाखांचा रिटर्न, फक्त करावी लागेल 'ही' एक गोष्ट

SBI की पोस्ट ऑफिस? FD वर मिळवा10 लाखांचा रिटर्न, फक्त करावी लागेल 'ही' एक गोष्ट

या योजनेंतर्गत केंद्र सरकारने प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये पाठवले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच शेतकऱ्यांची दिवाळीही गोड करणार आहेत. पीएम किसान योजनेचा १२ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून याची शेतकरी आतूरतेनं वाट पाहात आहेत. १७ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सरकारने एकूण 21000 कोटी रुपये खर्च केले आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना देशातील सर्वात मोठी योजना आहे. या योजनेंतर्गत १२ कोटी शेतकरी जोडले गेले आहेत. या योजनेंतर्गत केंद्र सरकारने प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये पाठवले आहेत. २००० रुपये टप्प्या टप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत.

या योजनेंतर्गत एका वर्षात तीन टप्प्यात पैसे खात्यावर जमा केले जातात. आतापर्यंत ११ टप्पे पूर्ण झाले आहेत, १२ व्या टप्प्यातील पैसे येणं अद्याप बाकी आहे. मात्र ते १७ ऑक्टोबरपर्यंत हे पैसे जमा होतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शेतकरी छोट्या छोट्या चुका करत असल्याने या योजनेचा लाभ त्यांना घेता आला नाही. काहीवेळा त्यांना या योजनेचा पूर्ण लाभही मिळू शकला नाही. यामध्ये तुम्हाला KYC करणं अत्यावश्यक आहे. पीएम किसान योजनेची पुढची रक्कम ही आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यावर जमा होणार आहे. त्याच्यामुळे KYC करणं बंधनकारक आहे.

जर शेतकऱ्यांनी KYC केलं नसेल तर त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार नाही. त्यांना या योजनेतील १२ व्या हप्त्याचा लाभ घेता येणार नाही. यासाठी सरकारकडून एक नंबर देखील जारी करण्यात आला आहे. त्यावरून देखील शेतकऱ्यांना सगळी माहिती मिळू शकते. 155261 या नंबरवर फोन करून शेतकरी माहिती घेऊ शकतात.

First published:

Tags: Farmer, PM narendra modi