मुंबई : तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या वर्षीच खरेदी करून घ्या. कारण येत्या काळात वाहन खरेदी करणाऱ्यांच्या खिशाचा भार वाढणार आहे. त्याचं कारण म्हणजे पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यापासून उत्सर्जनासंबंधी कठोर नियम लागू होणार आहेत. त्यानुसार वाहन निर्मात्या कंपन्यांनी त्यांची वाहनं अपडेट करण्यावर केलेली गुंतवणूक वाढल्याने प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
भारतीय वाहन उद्योग सध्या आपली वाहनं भारत स्टेज-VI (BS-6) उत्सर्जन मानदंडांच्या दुसऱ्या टप्प्याशी अनुकूल बनवण्याचा प्रयत्न करत आहे. असं झाल्यावर उत्सर्जन मानक युरो-6 मानकांच्या बरोबरीचे होतील.
कार प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांना नवीन मानकांचं पालन करण्यासाठी त्यामध्ये इतर उपकरणं बसवावी लागतील. अशा परिस्थितीत वाहन निर्मात्यांचा उत्पादन खर्च वाढू शकतो. परिणामी, त्याचा भार पुढच्या आर्थिक वर्षापासून वाहन खरेदी करणाऱ्यांना सोसावा लागेल, असे वाहन उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे.
नवीन उत्सर्जन मानकांची पूर्तता करण्यासाठी वाहनांना असं उपकरण बसवावं लागेल, जे चालत्या वाहनाच्या उत्सर्जन पातळीवर लक्ष ठेवू शकेल. यासाठी हे उपकरण कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आणि ऑक्सिजन सेन्सरसारख्या अनेक महत्त्वाच्या भागांवर लक्ष ठेवेल.
दिवाळीआधी मोठा धक्का, महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात पेट्रोल-डिझेल पुन्हा महागवाहन उत्सर्जन पातळी ठराविक मानकापेक्षा जास्त होताच, हे उपकरण वाहनाचं सर्व्हिसिंग करण्याची वेळ आली आहे हे सूचित करण्यासाठी इशारा देणारे वाहनातील लाईट लावेल.
याशिवाय वाहनात लागणाऱ्या इंधनाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी वाहनांमध्ये प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्टरही बसवण्यात येणार आहे. हे उपकरण पेट्रोल इंजिनला पाठवल्या जाणार्या इंधनाचं प्रमाण आणि वेळेवरही लक्ष ठेवेल. ‘वाहनांमध्ये वापरल्या जाणार्या सेमीकंडक्टर चिपला इंजिनचं तापमान, ज्वलनासाठी पाठवला जाणारा हवेचा दाब आणि उत्सर्जनात निघणाऱ्या कणांचं निरीक्षण करण्यासाठी अपडेट करावं लागेल,’ असं वाहन तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
वाहन क्षेत्रातील जाणकारांचं म्हणणं काय?
इक्रा रेटिंग्जचे उपाध्यक्ष रोहन कंवर गुप्ता म्हणाले की, नवीन मानकांच्या अंमलबजावणीमुळे वाहनांच्या एकूण किमतीत थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र ही वाढ बीएस -4 वरून बीएस -6 टप्प्यात जाताना झालेल्या वाढीपेक्षा तुलनेने कमी असेल. या गुंतवणुकीचा मोठा भाग वाहनात उत्सर्जन शोधण्याचं यंत्र लावण्यावर तसंच सॉफ्टवेअर अपडेट करण्यावर जाईल. बीएस-6 च्या पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्याचा खर्च तुलनेने कमी असेल, असंही त्यांनी सांगितलं.
व्वा! रेल्वेच्या तिकीटाएवढ्याच दरात करता येणार विमान प्रवास… ही कंपनी देतेय ‘ऑफर’भारतात नवीन उत्सर्जन मानक म्हणून बीएस-6 चा पहिला टप्पा 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आला होता. देशांतर्गत वाहन कंपन्यांना नवीन मानकांशी वाहनं जुळवून घेण्यासाठी सुमारे 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागली. प्रमुख वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष (ऑटोमोटिव्ह क्षेत्र) विजय नाकरा यांनी सांगितले की, कंपनीच्या सर्व वाहनांना बीएस-6 च्या दुसऱ्या टप्प्यातील मानकांसाठी योग्य बनवलं जाईल. त्यासाठी इंजिनाची क्षमता वाढवण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Gold Price Today : आनंदाची बातमी! सोन्याचे दर उतरले, खरेदीआधी तपासा किती आहे भाव?टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले की, कंपनी या बदलाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून, इंजिनीअरिंग क्षमतेचा मोठा भाग या विकास कामात गुंतला आहे. कंपनी बीएस-6 च्या दुसऱ्या टप्प्यासाठीदेखील तयारी करत आहे, असं देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी अधिकारी (कॉर्पोरेट अफेअर्स) राहुल भारती म्हणाले.