मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G सेवेचा शुभारंभ करण्यात आला. दिल्लीतील प्रगती मैदानावर इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC 2022) चे उद्घाटन केले. ही सेवा देशासाठी क्रांतिकारी बदल आणेल असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. देशात 5G नेटवर्क आल्याने अनेक क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होईल असंही ते म्हणाले. 5G नेटवर्कमुळे कृषी क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे. कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढवला जाऊ शकतो. कीटकनाशकांच्या फवारणीसाठी ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो. या सेवेमुळे अचूकता वाढेल. मॅपिंग करणं अधिक सोपं जाईल. पिकाचं निरीक्षण करणं अधिक सोपं जाईल. भारतात अन्न-धान्याच्या डेटाबाबत होणाऱ्या त्रुटी टाळता येतील. अचूकता येईल आणि उत्पादकांसाठी ते फायद्याचं ठरेल. 5G नेटवर्क सुरू झाल्यामुळे शेतकरी त्यांच्या स्वत:च्या शेतातील पिकांची विक्री चांगल्या वेगाने करू शकतील. त्याच वेळी, E-NAM पोर्टलवर शेतकर्यांना त्यांच्या पिकाच्या गुणवत्तेच्या आधारावर त्यांच्या पिकाची किंमत अधिक चांगल्या गतीने मिळू शकेल.
5G Launch In India Benefits : 5G सेवेमुळे आयुष्य 360 डिग्री बदलणार, तुम्हाला कसा होणार फायदा पाहाबऱ्याचदा हवामानाचा अंदाज बरोबर असूनही तो योग्य वेळी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येतात. कधीकधी हवामानाचा अंदाज उशिरा येतो. त्यामुळे पिकाचं मोठं नुकसान होतं. या सगळ्या गोष्टी सोप्या होतील आणि फायदेशीर होतील. 5G नेटवर्कद्वारे हवामानाची अचूक आणि अचूक माहिती मिळू शकणार आहे. त्यामुळे त्यांचे हवामानामुळे होणारे नुकसान कमी होईल.
5G Benefits: व्यवसाय, शिक्षण अन् नोकरी; 5G तंत्रज्ञानामुळं होणार हे अविश्वसनीय बदलशेतकऱ्यांना घरी बसून तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि व्हर्च्युअल प्रशिक्षण देण्यासाठी रोडमॅप सेट करण्यासाठी फायदेशीर ठरेल. सरकारी योजना किंवा बऱ्याचदा फॉर्म भरण्यासारख्या सुविधा असतात त्या ग्रामीण भागात खराब नेटवर्कमुळे अडकून पडतात. अशावेळी 5G या सगळ्याला गती देणारं ठरू शकतं असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.