जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 5G सिम कुठे मिळेल? तुमच्या मोबाईलमध्ये 5G Network कसं होईल सुरू? A टू Z माहिती

5G सिम कुठे मिळेल? तुमच्या मोबाईलमध्ये 5G Network कसं होईल सुरू? A टू Z माहिती

5G सिम कुठे मिळेल? तुमच्या मोबाईलमध्ये 5G Network कसं होईल सुरू?

5G सिम कुठे मिळेल? तुमच्या मोबाईलमध्ये 5G Network कसं होईल सुरू?

सध्या बाजारात 2G, 3G आणि 4G सिम उपलब्ध आहेत. 5G सिमबद्दल बोलायचं झालं तर ते सध्याच्या 4G सिमसारखे असेल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 1 ऑक्टोबर : मोठ्या धुमधडाक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC 2022) मध्ये रिमोट बटण दाबून भारतात 5G इंटरनेट सेवा सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात 13 शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे यांचा समावेश आहे. यानंतर 5G देशाच्या प्रत्येक भागात पोहोचवले जाणार आहे. 5जी सेवा सुरू झाली असली तरी ती आपल्यापर्यंत कशी पोहचणार? त्यासाठी काय करावं लागेल? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात असतील तर काळजी करू नका. तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन आता होणार आहे. विशेष म्हणजे 5G सेवा सुरू होण्यापूर्वीच 5G स्मार्टफोन बाजारात आले आहेत आणि सेवा सुरू होताच लोकांना सुपर फास्ट 5G इंटरनेटचा आनंद घेता येणार आहे. वास्तविक, प्रश्न उद्भवतो की 5G नेटवर्क आल्यानंतर 5G सिम कसे उपलब्ध होणार? आणि तुमचा जुना नंबर 5G सिम कार्डवर कसा वापरला जाईल. आम्ही कशाला आहोत? चला जाणून घेऊ. 5G स्मार्टफोनवर 5G सिम कार्ड कसे वापरता येईल. सिमच्या आकारात कोणताही बदल होणार नाही सध्या बाजारात 2G, 3G आणि 4G सिम आहेत. सध्या, फीचर फोन वापरकर्ते 2G सिम वापरतात, स्मार्टफोन वापरकर्ते 3G आणि 4G दोन्ही सिम कार्ड वापरतात. 5G सिमबद्दल बोलायचं झालं तर तर ते सध्याच्या 4G सिमसारखे असेल. मिळालेल्या माहितीनुसार, 4G सिमच्या आकारात किंवा शेपमध्ये कोणताही बदल होणार नाही. वाचा - 5G Launch : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5G सेवेचा शुभारंभ, पाहा VIDEO 4G सिम पकडणार 5G नेटवर्क तुम्ही कोणत्याही कंपनीचे 4G सिम वापरत असला तरी, ते 5G नेटवर्क चालवण्यास सक्षम असणार आहे. हे कसे शक्य होईल? याबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. वास्तविक, सिममध्ये कोणतेही तंत्रज्ञान नाही. सिमद्वारे, तुम्हाला फक्त एकच युनिक आयडी दिला जातो आणि त्या आयडीनुसार तुमच्या नंबरवर प्लॅन सक्रिय केला जातो. अशा परिस्थितीत तुम्हाला नवीन सिम घेण्याची गरज भासणार नाही.

News18लोकमत
News18लोकमत

कोणत्या मोबाईल फोनमध्ये 5G सिम चालेल? 5G सिम फक्त 5G फोनवरच वापरता येईल. तसेच, ज्या मोबाईल वापरकर्त्यांनी 5G फोन विकत घेतले आहेत त्यांना 5G सिम स्वतंत्रपणे खरेदी करण्याची गरज नाही. ग्राहक त्यांच्या 4G सिमवरुन 5G नेटवर्कशी कनेक्ट करू शकतील. 5G प्लॅन खरेदी करणे आवश्यक 4G सिम फक्त 5G सिममध्ये रूपांतरित होईल. त्यामुळे याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यात एकाच वेळी 5G इंटरनेट चालवू शकता. तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर 5G सेवेचा लाभ हवा असेल, तर तुम्हाला 5G प्लॅन स्वतंत्रपणे खरेदी करावे लागतील आणि त्या 5G पॅकमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांनुसार तुम्हाला 5G सेवा मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: 5G , mobile
  • First Published :
जाहिरात
जाहिरात