मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

5G Benefits: व्यवसाय, शिक्षण अन् नोकरी; 5G तंत्रज्ञानामुळं होणार हे अविश्वसनीय बदल

5G Benefits: व्यवसाय, शिक्षण अन् नोकरी; 5G तंत्रज्ञानामुळं होणार हे अविश्वसनीय बदल

5G लाँचनंतर10-12 हजारांचे स्वस्त मोबाईल बंद होतील?वाचा तुमच्या प्रश्नांची उत्तरे

5G लाँचनंतर10-12 हजारांचे स्वस्त मोबाईल बंद होतील?वाचा तुमच्या प्रश्नांची उत्तरे

Effect of 5G Technology: 5G तंत्रज्ञान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाँचिंग करण्यात आलं. 5G तंत्रज्ञानामुळं देशातील विविध क्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार आहे. तंत्रज्ञान, शिक्षण, रोजगार यांवरही 5Gचा परिणाम होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 1 ऑक्टोबर: 5G तंत्रज्ञान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाँचिंग करण्यात आलं. 5G तंत्रज्ञानामुळं देशातील विविध क्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार आहे. तंत्रज्ञान, शिक्षण, रोजगार यांवरही 5Gचा परिणाम होणार आहे.

इंटरनेटचा वेग 5G पेक्षा 10 पट जास्त असेल-

संपूर्ण देशात 5G लागू झाल्यानंतर मोबाईल टेलिफोनीचे जग बदलेल. एका अंदाजानुसार, 5G चं स्पीड 4G पेक्षा 10 पट जास्त आहे. 5G आल्यानंतर ऑटोमेशन वाढेल, असा अंदाज आहे. आतापर्यंत ज्या गोष्टी मोठ्या शहरांपुरत्या मर्यादित होत्या त्या खेड्यापाड्यात पोहोचतील, ज्यामध्ये ई-औषध, शिक्षण क्षेत्र, कृषी क्षेत्र यांचा मोठा फायदा होईल. 5G सेवेचा शुभारंभ डिजिटल क्रांतीला नवा आयाम देईल. त्याच वेळी, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि औद्योगिक IoT आणि रोबोटिक्सचे तंत्रज्ञान देखील पुढे जाईल. याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होईल. ई-गव्हर्नन्सचा विस्तार होईल.

5G आल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होईल. ई-कॉमर्स, आरोग्य केंद्रे, दुकानदार, शाळा, महाविद्यालये आणि अगदी शेतकरीही याचा पुरेपूर लाभ घेऊ शकतील. कोरोनाच्या काळात इंटरनेटवर ज्याप्रकारे प्रत्येकाचे अवलंबित्व वाढले आहे. ते पाहता, 5G आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचे जीवन अधिक चांगलं आणि सोपं बनविण्यात मदत होईल. 5G तंत्रज्ञान आरोग्यसेवा, आभासी वास्तव, क्लाउड गेमिंगसाठी नवीन मार्ग उघडेल. चालकविरहित कारची शक्यता यातून पूर्ण होणार आहे.

 5g नेटवर्क काय आहे?

येणारा काळ हा पाचव्या पिढीचा म्हणजेच 5G चा आहे. हे 4G नेटवर्कपेक्षा खूप वेगवान आहे. 4G नेटवर्कवर जिथे सरासरी इंटरनेट स्पीड 45 Mbps आहे पण 5G नेटवर्कवर हा स्पीड 1000 Mbps पर्यंत वाढेल. त्यामुळं इंटरनेटचं जग पूर्णपणे बदलून जाईल. सामान्य जीवनात याचा अर्थ असा होईल की, 4G पेक्षा 10 ते 20 पट वेगानं डेटा डाउनलोड होईल. 4G नेटवर्कवर चित्रपट डाउनलोड करण्यासाठी जिथे सहा मिनिटे लागतात, तिथे 5G नेटवर्कवर डाउनलोड करण्यासाठी 20 सेकंद लागतील. 5G नेटवर्कवर मशीन एकमेकांशी बोलतील.

5G मुळे या क्षेत्रांवर होणार परिणाम:

वर्क फ्रॉम होम: कोरोनानं दार ठोठावल्यानंतरही अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी घरून काम करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 5G तंत्रज्ञान आल्यानंतर या सेवेचा विस्तार होईल. हायब्रीड वर्क कल्चरचा विस्तार होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने अनेक गोष्टी स्वयंचलित पद्धतीनं करणं शक्य होणार आहे. जेणेकरून कर्मचाऱ्यांना इतर महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करता येईल.

शिक्षण : कोरोनाच्या काळात सर्वाधिक परिणाम शिक्षणावर झाला आहे. शाळा, महाविद्यालये बंद होती. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाद्वारे शिक्षण मिळाले. याचे श्रेय देशातील डिजिटल क्रांतीला जाते. आणि 5G तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या आणि सोप्या पद्धतीनं शिक्षण दिलं जाऊ शकतं. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना स्वस्त आणि चांगलं शिक्षण देता येईल.

हेही वाचा: सावधान! 5Gमुळं तुम्ही कंगाल तर होणार नाही ना? तज्ज्ञांनी दिला सावधतेचा इशारा, वाचा कारण

टेलिहेल्थ: 5G सेवेच्या आगमनानंतर देशातील आरोग्य सेवांच्या वितरणात क्रांतिकारक बदल होऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 5G च्या मदतीनं रुग्णांच्या निदान आणि उपचारात मोठी सुधारणा होणार आहे. रोबोटिक शस्त्रक्रिया करता येऊ शकेल. 5G मुळं टेलिमेडिसिनचा विस्तार होईल. एका अभ्यासानुसार, 2017 ते 2023 दरम्यान टेलिमेडिसिन मार्केट 16.5 टक्के दरानं वाढेल, परंतु 5G च्या आगमनानंतर ते आणखी वेगवान होईल. ग्रामीण भागात व्हिडिओच्या माध्यमातून मोठमोठे डॉक्टर रुग्णांशी थेट संपर्क साधून उपचार करू शकतील. यामुळे सर्वांना चांगली आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल. रुग्णवाहिकेवरील रुग्णाला रुग्णालयात आणताना वाचवता येऊ शकतं. ज्या डॉक्टरकडून तुम्हाला ऑपरेशन करून घ्यायचं आहे, पण डॉक्टर उपलब्ध नसेल, तर तज्ज्ञ डॉक्टर तुमच्यावर 5G च्या माध्यमातून उपचार करू शकतील.

रिमोट कंट्रोल कार: 5G तंत्रज्ञान आल्यानंतर ड्रायव्हरलेस कार उपलब्ध होऊ शकतात. कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये कुठेही बसून तुम्ही ड्राइवरलेस कार बोलावू शकाल.

स्मार्ट सिटी: 5G आल्यानंतर शहरे अधिक स्मार्ट होतील. 5G तंत्रज्ञान शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी, शहरे स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल.

Clyde-gaming: Airtel ने 5G इंटरनेटवर देशातील पहिले क्लाउड-गेमिंग सेशन यशस्वीरित्या आयोजित केले आहे. मानेसर, गुडगाव येथे गेमिंग सेशन आयोजित करण्यात आलं होतं. क्लाउड गेमिंग हे 5G साठी वापरल्या जाणार्‍या सर्वात मोठ्या प्रकरणांपैकी एक असेल. क्लाउड गेमिंग वापरकर्त्याला कोणत्याही गेमिंग हार्डवेअरमध्ये गुंतवणूक न करता रिअल-टाइममध्ये गेम खेळण्याचा आनंद घेता येईल.

मनोरंजन : 4G आल्यानंतर देशातील मनोरंजनाचे जग बदलले आहे. OTT प्लॅटफॉर्मचा जन्म कंटेंट प्रदाता म्हणून झाला. मल्टिप्लेक्स आणि सिनेमा हॉल सोडून लोक घरी बसून OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपटांपासून वेब सिरीज पाहू लागले. 5G आल्यानंतर मनोरंजनात मोठा बदल होईल. हाय स्पीडमुळं ऑनलाइन कंटेंटच्या क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे.

First published:

Tags: 5G, Education, Job