मराठी बातम्या /बातम्या /मनी /

भारतात 3 गुहांमध्ये लाखो टन कच्च्या तेलाचा साठा, वाजपेयी सरकारचा निर्णय ठरतोय फायद्याचा

भारतात 3 गुहांमध्ये लाखो टन कच्च्या तेलाचा साठा, वाजपेयी सरकारचा निर्णय ठरतोय फायद्याचा

भारतात 80 टक्के तेल आयात केलं जातं. पण आपल्या देशातही तेलाचा रिझर्व्ह साठा उपलब्ध आहे. देशामध्ये विशाखापट्टणम, मंगळुरू आणि पडूर या 3 भूमिगत कच्च्या तेलाच्या गुहा आहेत.

भारतात 80 टक्के तेल आयात केलं जातं. पण आपल्या देशातही तेलाचा रिझर्व्ह साठा उपलब्ध आहे. देशामध्ये विशाखापट्टणम, मंगळुरू आणि पडूर या 3 भूमिगत कच्च्या तेलाच्या गुहा आहेत.

भारतात 80 टक्के तेल आयात केलं जातं. पण आपल्या देशातही तेलाचा रिझर्व्ह साठा उपलब्ध आहे. देशामध्ये विशाखापट्टणम, मंगळुरू आणि पडूर या 3 भूमिगत कच्च्या तेलाच्या गुहा आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 12 मार्च : भारतात 80 टक्के तेल आयात केलं जातं. पण आपल्या देशातही तेलाचा रिझर्व्ह साठा उपलब्ध आहे. काही वर्षांपूर्वी केंद्राने घेतलेला निर्णय आता फायद्याचा ठरणार आहे. आता ओडिसा आणि कर्नाटकमध्ये जमिनीखाली गुहांमध्ये कच्च्या तेलाचा साठा करण्यात येणार आहे. केंद्राच्या या निर्णयाचा फायदा भविष्यात होईल. सध्या आपल्या देशात 3 तेलाच्या भूमिगत गुहा आहेत, ज्यामध्ये 5.33 दशलक्ष टन तेल साठवण्याची क्षमता आहे. 12 दिवस पुरेल इतका हा साठा आहे. नवीन भूमिगत तेलाच्या गुहा बनवल्यानंतर भारताकडे 22 दिवसांचा साठा निर्माण होईल. या गुहांमध्ये 65 लाख टन कच्च्या तेलाचा साठा करण्यात येणार आहे.

(हे वाचा- 'कोरोना'मुळे शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 2600 तर निफ्टी 700 अंकानी कोसळला)

देशामध्ये 3 भूमिगत कच्च्या तेलाच्या गुहा आहेत. विशाखापट्टणम, मंगळुरू आणि पडूर  याठिकाणी या गुहा आहेत. जमिनीखाली गुहांमध्ये असणाऱ्या कच्च्या तेलाच्या साठ्याला अधिकृत भाषेमध्ये स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हटलं जातं. तेल मार्केटिंग कंपन्या आणि प्रोडक्शन कंपन्या सुद्धा तेलाची आयात करतात. मात्र तेलाचा स्ट्रॅटेजिक साठा या कंपन्यांच्या तेलभांडारापेक्षा वेगळा आहे. सर्वसाधारणपणे भारतीय रिफायनरी कंपन्यांमध्ये 60 दिवस पुरेल एवढा साठा असतोच.

अटल बिहारी वाजपेयींची कल्पना

1990 च्या दशकातील आखाती युद्धादरम्यान (Gulf War) भारतात आर्थिक परिस्थिती बिकट होती. कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. आर्थिक संकटात सापडलेल्या भारतात केवळ 3 आठवड्यांपुरता कच्च्या तेलाचा साठा होता. त्यानंतर मनमोहन सरकारने ही परिस्थिती व्यवस्थित हाताळली होती. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाची नीती वापरून अर्थव्यवस्था रूळावर आणली होती. यानंतर तेलाच्या चढत्या-उतरत्या किंमती भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम करत होत्या. ही समस्या संपवण्यासाठी 1998 साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी भूमिगत साठा करण्याचा निर्णय घेतला होता. ज्याचा फायदा आजही होणार आहे.

स्ट्रॅटेजिक तेलाच्या साठ्यावर हक्क कुणाचा?

53 लाख क्षमता असणाऱ्या या भूमिगत गुहांमध्य सध्या 55 टक्के कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध आहे. या भूमिगत गुहांमध्ये तेल भरण्याची जबाबदारी सरकारने विदेशी कंपन्यांना दिली आहे. आबुधाबी नॅशनल ऑईल कंपनी त्यापैकी एक आहे. मात्र आपात्कालीन परिस्थितीत भारतचा या तेलाच्या साठ्यावर हक्क असेल.

First published:

Tags: Atal bhihari vajpayee, Narendra modi