श्रीनगर, 11 मार्च : कोरोनाव्हायरस (Coronavirus) बचावाचा एक मार्ग म्हणजे हात स्वच्छ धुणे. घराबाहेर असताना हात स्वच्छ ठेवण्यासाठी हँड सॅनिटायझर (hand sanitizer) वापरलं जातं. मात्र तुम्ही वापरत असलेलं हँड सॅनिटायझर बनावट तर नाही ना? कारण काश्मीरमध्ये (kashmir) असे बनावट हँड सॅनिटायझर सापडलेत.
कोरोनाव्हायरसच्या भीतीनं लोकं हँड सॅनिटायझरचा भरपूर वापर करत आहेत, त्यामुळे मागणी वाढली आहे आणि याचा फायदा घेत काश्मीरमध्ये बनावट हँड सॅनिटायझर बनवलं जातं आहे.
हे वाचा - Coronavirus पासून वाचण्यासाठी वारंवार हँड सॅनिटायझर वापरताय, इतर आजारांना आमंत्रण देताय
काश्मीरमधील औषध आणि अन्न नियंत्रण विभागानं याची पोलखोल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाने छापे टाकले त्यावेळी असे बनावट हँड सॅनिटायझर बनवले जात असल्याचं दिसून आलं आहे. शिवाय याआधी अशा हँड सॅनिटायझर बाजारातही गेलेत. यानंतर प्रशासनाने
नागबल गांदरबलमधील युनिट सील केलं आणि त्याचे दुवे एचएमटी श्रीनगर औद्योगिक वसाहतीत सापडलेत.
याआधी महाराष्ट्रात काही ठिकाणी बनावट मास्कची विक्री केली जात असल्याचं समोर आलं होतं. आता मास्कनंतर बाजारात आलेले सॅनिटायझरही बनावट असू शकतात, त्यामुळे सावध राहा.
संबंधित - कफ सिरप ठरलं विष! खोकल्याच्या औषधामुळे 9 मुलांचा मृत्यू
दरम्यान याआधी जम्मूमध्ये कप सिरफमध्ये विषारी द्रव्यं असल्याचं आढळून आलं होतं. ज्यामुळे 9 मुलांचा मृत्यू झाला होता. कोल्ड बेस्ट पीसी कफ सिरप हे औषध हिमाचल प्रदेशमधील डिजिटल व्हिजन नावाची कंपनी तयार करते. चंदीगड इथल्या PGIMER अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कफ सिरपमुळेच 9 मुलांचा मृत्यू झाला आहे. या कफ सिरपमध्ये Diethylene Glycol या विषारी पदार्थ आढळला आहे. जो हानीकारक आहे. त्यानंतर 8 राज्यांमध्ये या कफ सिरपच्या विक्रीवर बंद घालण्यात आली आहे. या राज्यात पोहोचलेल्या औषधाच्या बाटल्या परत मागवण्यात आल्या आणि त्या तपासणीसाठी पाठवण्यात आल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.