मोदी सरकार देतेय वर्षाला 10 लाख रुपये कमवण्याची संधी, सुरू करा 'हा' व्यवसाय

मोदी सरकार देतेय वर्षाला 10 लाख रुपये कमवण्याची संधी, सुरू करा 'हा' व्यवसाय

सरकारनं व्यवसायाची ज्या प्रकारे आखणी केलीय त्यातून तुम्हाला वर्षाला 10 लाख रुपये नफा मिळू शकतो.

  • Share this:

मुंबई, 03 जून : कुठला व्यवसाय सुरू करायचा असेल तर गुंतवणूक आणि त्यातून होणारा नफा याला खूप महत्त्व असतं. आम्ही तुम्हाला अशा एका उद्योगाची माहिती देतोय, ज्यात गुंतवणूक जास्त असेल आणि नफाही जास्त होईल. हा व्यवसाय सरकारच्या एमएसएमई योजनेशी संबंधित आहे.  यामध्ये व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला सरकारकडून मदतही मिळते. सरकारनं व्यवसायाची ज्या प्रकारे आखणी केलीय त्यातून तुम्हाला वर्षाला 10 लाख रुपये नफा मिळू शकतो.

सुरू करा हा व्यवसाय

ट्रेंडी आणि स्टायलीश फुटवेअरची मागणी वाढली आहे. त्यामुळे या क्षेत्रात तुम्ही तुमचं करियर करू शकता. म्हणजे तुम्ही फुटवेअर बनवण्याचं युनिट सुरू करून चांगली कमाई करू शकता. मागणी वाढली की तुमचा उद्योगही यशस्वी होईल. यासाठी सरकार आपल्या मुद्रा योजनेअंतर्गत मदतही करते.

रत्नागिरीमध्ये विहिरीत गुदमरून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू

World Cup : अशी असेल भारतीय संघाची भगव्या रंगाची जर्सी, फोटो झाले व्हायरल

काय आहे प्रोजेक्टची किंमत ?

फुटवेअर बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पूर्ण खर्च 41.32 लाख रुपये लागतो. त्यासाठी तुम्हाला 16.32 लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल.

जमीन- 4 लाख रुपये

बिल्डिंग - 8 लाख रुपये

प्लान्ट आणि मशीनरी - 19,85,990 रुपये

इलेक्ट्रिफिकेशन- 96,610 रुपये

प्री ऑपरेशन खर्च- 35,000 रुपये

इतर खर्च- 33,000 रुपये

खेळतं भांडवल- 7,81,450 रुपये

एकूण - 41,32,050 रुपये

कर्ज देऊन सरकार करेल मदत

वर्किंग कॅपिटल कर्ज - 3 लाख रुपये

टर्म कर्ज - 22 लाख रुपये

हे कर्ज मुद्रा योजनेअंतर्गत कुठल्याही बँकेकडून सहज मिळू शकतं.

म्हाडाच्या 217 घरांसाठी सोडत जाहीर, असं चेक करा तुमचं नाव

असा होईल नफा

16.32 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर जी आखणी केलीय, त्याप्रमाणे महिन्याला टर्नओव्हर 9,07,050 रुपये होईल.

खर्च आणि उत्पन्न - 8,26,080 दर महिन्याला रुपये

एकूण खर्च - 80,970 दर महिन्याला रुपये

वर्षाला विक्री - 108.90 लाख रुपये

वर्षाला नफा - 9.72 लाख रुपये

कसा करायचा कर्जासाठी अर्ज?

पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत तुम्ही कुठल्याही बँकेत अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला फाॅर्म भरावा लागेल. त्यात डिटेल्स द्यावे लागतील. नाव, पत्ता, व्यवसाय सुरू करण्याचा पत्ता, शिक्षण, उत्पन्न आणि किती कर्ज हवं हे सगळं द्यावं लागेल. यात कुठल्याही प्रकारची प्रोसेसिंग फी किंवा गॅरंटी फी द्यावी लागणार नाही. कर्जाची रक्कम 7 वर्षात परत देऊ शकता.

VIDEO : दोन दिवसांत वादळासह पूर्वमोसमी पावसाचा अंदाज, पाहा 'टॉप 18 बातम्या'

First published: June 3, 2019, 12:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading