Home /News /money /

Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात काय आहे इंधनाचा दर? या शहरात सर्वाधिक महाग आहे पेट्रोल

Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात काय आहे इंधनाचा दर? या शहरात सर्वाधिक महाग आहे पेट्रोल

पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price on 05th January 2022) आज बुधवारी जारी करण्यात आले आहेत, आजही इंधनाचे दर बदलेले नाहीत. आजही पेट्रोल-डिझेलसाठी (Latest Fuel Rates) सामान्यांना तेवढीच किंमत मोजावी लागणार आहे.

    मुंबई, 05 जानेवारी: पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price on 05th January 2022) आज बुधवारी जारी करण्यात आले आहेत, आजही इंधनाचे दर बदलेले नाहीत. आजही पेट्रोल-डिझेलसाठी (Latest Fuel Rates) सामान्यांना तेवढीच किंमत मोजावी लागणार आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रातील इतर शहरातही पेट्रोल-डिझेलच्या दरात अगदी किरकोळ बदल झाला आहे, तर काहीठिकाणी दर स्थिर आहेत. पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 0.19 रुपयांनी कमी होऊन 109.45 रुपये प्रति लीटरवर आहेत, तर डिझेल 92.25 रुपये प्रति लीटरवर आहे. महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये मिळते आहे. जाणून घ्या महाराष्ट्रातील इतर शहरात इंधनाचा दर काय आहे. महाराष्ट्रातील इंधनाचे दर
    शहरपेट्रोलचा भाव (प्रति लीटर)डिझेलचा भाव (प्रति लीटर)
    पुणे109.45 रुपये92.25 रुपये
    मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
    नाशिक109.82 रुपये92.60 रुपये
    नागपूर109.74 रुपये92.52 रुपये
    अहमदनगर110.56 रुपये93.31 रुपये
    औरंगाबाद110.66 रुपये93.41 रुपये
    रत्नागिरी111.56 रुपये94.27 रुपये
    रायगड109.46 रुपये92.23 रुपये
    परभणी113.19 रुपये95.84 रुपये
    पालघर109.63 रुपये92.39 रुपये
    सांगली109.65 रुपये92.47 रुपये
    कोल्हापूर111.08 रुपये93.84 रुपये
    दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. हे वाचा-Crypto ATM : जगभरात वाढतेय क्रिप्टो ATM ची संख्या; जाणून घ्या कार्यप्रणाली अशाप्रकारे घरबसल्या तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर (How to Check Petrol and Diesel Price) पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (How to check diesel petrol price daily) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात. लवकर स्वस्त होणार इंधन पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी सरकार नवीन प्लॅन तयार करत आहे. भारत कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्यासाठी अन्य प्रमुख अर्थव्यवस्थांसह समन्वयाने भारत धोरणात्मक तेल साठ्यातून तेल काढण्याच्या योजनेवर काम करत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price

    पुढील बातम्या