पुणे, 05 जानेवारी: देशांतर्गत गॅस कंपन्याही काळानुसार बदलू लागल्या आहेत. कंपन्यांनी आता घरगुती गॅस सिलेंडरमध्येही (LPG Gas Cylinder Price) बदल करण्यास सुरुवात केली आहे, यामध्ये मुख्य बदल या सिलेंडरच्या वजनात होतो आहे. सामान्य गॅस सिलेंडर व्यतिरिक्त आता या कंपन्यांनी कंपोझिट गॅस सिलेंडर बाजारात आणले आहेत. वजनाने कमी असलेला या सिलेंडरची दिल्लीत किंमत 634 रुपये (Composite Gas Cylinder Price) आहे. दरम्यान देशभरातील काहीच शहरात ही सुविधा दिली जात आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार या कंपनीची सुविधा महाराष्ट्रात अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे याठिकाणी कंपोझिट गॅस सिलेंडर उपलब्ध आहे. इंडियन आइलच्या वेबसाइटनुसार, महाराष्ट्रामध्ये या सिलेंडरची किंमत 634 रुपये आहे. देशभरातील विविध शहरात या गॅस सिलेंडरची किंमत वेगवेगळी आहे. हे वाचा- SBI ग्राहकांना झटका! फेब्रुवारीपासून महागणार ही सेवा, द्यावे लागणार 20 रुपये+GST कंपोझिट गॅस सिलिंडरमध्ये 10 किलो गॅस असतो. संमिश्र गॅस सिलेंडर पारदर्शक आहे. त्याचे वजन कमी असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे सोपे जाते. ज्या घरामध्ये गॅस कमी वापरला जातो, त्यांच्यासाठी हा पर्याय उपयुक्त आहे. हे वाचा- अर्थसंकल्पासंबंधी देश स्वतंत्र झाल्यापासून ते आजवरच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी काय आहे कंपोझिट गॅस सिलेंडर? कंपोझिट सिलेंडर लोखंडाच्या सिलेंडरपेक्षा वजनाने 7 किलो हलका आहे. या एलपीजी सिलेंडरमध्ये तीन थर असतात. सध्या वापरल्या जाणाऱ्या रिकाम्या सिलेंडरचे वजन 17 किलो आहे. गॅस भरल्यावर त्याचे वजन 31 किलोपेक्षा थोडे जास्त असते. आता ग्राहकांना 10 किलोच्या कंपोझिट सिलेंडरमध्ये 10 किलो गॅसच मिळेल. अशाप्रकारे याचे एकूण वजन 20 किलो असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.