मराठी बातम्या /बातम्या /मनी /'हे' प्रसिद्ध अब्जाधीश भरतायंत अत्यल्प टॅक्स, अहवालामध्ये धक्कादायक खुलासा

'हे' प्रसिद्ध अब्जाधीश भरतायंत अत्यल्प टॅक्स, अहवालामध्ये धक्कादायक खुलासा

विवाद से विश्वास या योजनेतंर्गत घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत आहे. प्रलंबित योजनांचं निराकरण करणं हा या योजनेचा उद्देश आहे. सर्व न्यायालयांमध्ये थेट कराशी संबंधित 9.32 लाख कोटी रुपयांचे 4.83 लाख खटले प्रलंबित आहेत. त्यांना व्याज आणि दंडावर पूर्णपणे सूट आहे.

विवाद से विश्वास या योजनेतंर्गत घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत आहे. प्रलंबित योजनांचं निराकरण करणं हा या योजनेचा उद्देश आहे. सर्व न्यायालयांमध्ये थेट कराशी संबंधित 9.32 लाख कोटी रुपयांचे 4.83 लाख खटले प्रलंबित आहेत. त्यांना व्याज आणि दंडावर पूर्णपणे सूट आहे.

तुम्हाला माहित आहे का की अमेरिकेतील सर्वात जास्त श्रीमंत 25 लोकं सरकारला कोणताच टॅक्स देत नाहीत किंवा अत्यंत कमी टॅक्स भरत आहेत. यामध्ये जेफ बेझोस (Jeff Bezos), माइक ब्लूमबर्ग (Mike Bloomberg) आणि एलन मस्क (Elon Musk) यांच्यासारख्या जगातील श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 10 जून: तुम्हाला माहित आहे का की अमेरिकेतील सर्वात जास्त श्रीमंत 25 लोकं सरकारला कोणताच टॅक्स देत नाहीत किंवा अंत्यंत कमी टॅक्स भरत आहेत. यामध्ये जेफ बेझोस (Jeff Bezos), माइक ब्लूमबर्ग (Mike Bloomberg) आणि एलन मस्क (Elon Musk) यांच्यासारख्या जगातील श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. न्यूयॉर्क टाइम्समधील एका वृत्तामधील ProPublica च्या रिपोर्ट नुसार, 2014 ते 2018 या चार वर्षांत या उद्योगपतींनी त्यांच्या उत्पन्नापेक्षा खूपच कमी टॅक्स दिला किंवा अगदी नाहीच्या बरोबर टॅक्स दिला आहे. ProPublica ने याबद्दलचा डेटा सार्वजनिकरित्या जाहीर केला. या रिपोर्टमध्ये त्यांनी अब्जाधीशांच्या प्राप्तिकरातील अंतर्गत रेवेन्यूचे विश्लेषण केले आहे.

या अब्जाधीशांचा समावेश

या लिस्ट मध्ये जेफ बेझोस, मायकल ब्लूमबर्ग, एलन मस्क, वॉरेन बफेट, बिल गेट्स, रूपर्ट मर्डोक आणि मार्क झुकरबर्ग सह 25 अमेरिकी अब्जाधीशांचा समावेश आहे. या रिपोर्टमधील माहितीनुसार, अमेरिकेतील टॅक्स सिस्टममध्ये बरीच असमानता आहे. तेथील जेफ बेजोस, एलन मस्क, वॉरेन बफेट, माइकल ब्लूमबर्ग सारखे अब्जाधीश या टॅक्स सिस्टममधील त्रुटींचा गैरफायदा घेत आहेत. या विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की अमेरिकेच्या या श्रीमंतांनी त्यांच्या संपत्तीचा थोडासाच हिस्सा टॅक्स म्हणून दिला, मात्र त्यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

हे वाचा-या सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, महत्त्वाच्या सर्व्हिसमध्ये समस्या

जेफ बेझोस यांनी टॅक्सच भरला नाही

या अहवालानुसार, प्रो पब्लिकाने (ProPublica) असं म्हटलंय की 2007 मध्ये जेफ बेझोस यांनी फेडरल इन्कम टॅक्सच्या स्वरुपात एक पैसाही जमा केला नाही. तर टेस्लाचे चीफ एलन मस्क यांनी 2018 मध्ये इन्कम टॅक्सच भरलेला नाही. तसेच मायकेल ब्लूमबर्ग यांनी अलीकडच्या वर्षांत असंच केलंय. जॉर्ज सोरोस यांनीही सलग तीन वर्षे कोणताही फेडरल इन्कम टॅक्स भरलेला नाही.

अशा प्रकारे वाचवताहेत टॅक्स

या श्रीमंत व्यक्तींनी कमवलेल्या पैशांपैकी बहुतांश भाग त्यांच्यामार्फत चालविल्या जाणार्‍या कंपन्यांचे शेअर्स, व्हेकेशन्स होम, यॉट किंवा इतर गुंतवणूकीचा असतो आणि तो 'करपात्र' उत्पन्नाच्या कक्षेत येत नाही. जेव्हा त्या मालमत्ता विकल्या जातात तेव्हाच त्या करपात्र मानल्या जातात आणि हे श्रीमंत लोक अशाप्रकारे कर वाचवून त्याचा फायदा घेतात. याशिवायही, टॅक्स कोडमध्ये बऱ्याच त्रुटी आहेत. जे एकतर त्यांचं कर दायित्व मर्यादित करतात किंवा पूर्णपणे संपवून टाकतात.

हे वाचा-शेअर बाजाराला पुन्हा हर्षद मेहता काळाची आठवण; सध्याची तेजी बुडबुडा तर नाही?

दरम्यान, व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जेन साकी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की कोणत्याही व्यक्तीकडून दुसऱ्याची गोपनीय माहिती अनधिकृतपणे उघड करणं बेकायदेशीर आहे. एफबीआय आणि कर अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

First published:

Tags: Elon musk, United States of America