मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सोन्यामध्ये गुंतवणूक करताना बँकेतून कधीच खरेदी करू नका सोन्याची नाणी, हे आहे कारण

सोन्यामध्ये गुंतवणूक करताना बँकेतून कधीच खरेदी करू नका सोन्याची नाणी, हे आहे कारण

भविष्याचा विचार करता सोन्यामध्ये गुंतवणूक करताना दागिन्यांऐवजी नाणी खरेदी करणे अधिक फायद्याचे आहे. सोन्याची नाण्यातून तुम्हाला गरज असेल तेव्हा रोख रक्कम मिळवता येईल.

भविष्याचा विचार करता सोन्यामध्ये गुंतवणूक करताना दागिन्यांऐवजी नाणी खरेदी करणे अधिक फायद्याचे आहे. सोन्याची नाण्यातून तुम्हाला गरज असेल तेव्हा रोख रक्कम मिळवता येईल.

भविष्याचा विचार करता सोन्यामध्ये गुंतवणूक करताना दागिन्यांऐवजी नाणी खरेदी करणे अधिक फायद्याचे आहे. सोन्याची नाण्यातून तुम्हाला गरज असेल तेव्हा रोख रक्कम मिळवता येईल.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : ऑगस्टमध्ये सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते, त्यानंतर सप्टेंबरमध्ये पुन्हा सोन्याच्या दरात विक्रमी घसरण झाली. दरम्यान भविष्यात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी सोन्यामध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरत आहे. दीर्घ कालीन फायद्यासाठी ही गुंतवणूक (Invesment in Gold)उपयोगी ठरते. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. याकरता तुम्ही गोल्ड ईटीएफ, सॉव्हरेन गोल्ड बाँड किंवा फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता. फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक करताना तुमच्याकडे दागिने किंवा सोन्याची नाणी खरेदी करण्याचा पर्याय आहे.

भविष्याचा विचार करता सोन्यामध्ये गुंतवणूक करताना दागिन्यांऐवजी नाणी खरेदी करणे अधिक फायद्याचे आहे. सोन्याची नाण्यातून तुम्हाला गरज असेल तेव्हा रोख रक्कम मिळवता येईल. त्याचप्रमाणे यांची विक्री करताना मेकिंग चार्ज किंवा वेस्टेज चार्ज आकारला जाणार नाही. सोन्याची नाणी दागिन्यांप्रमाणे कालांतराने काळी नाही पडत.

(हे वाचा-Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतींचा ग्राफ चढताच, इथे वाचा आजचे दर)

सोन्याची नाणी तुम्ही सराफाव्यतिरिक्त बँकांमध्ये खरेदी करू शकता. बँकेत तुम्हाला 99.9 शुद्द 24 कॅरेट सोन्याची नाणी मिळतील. बँकेत केवायसी अपडेटेड असेल तर कोणत्याही वेळी तुम्ही बँकेच्या कोणत्याही शाखेतून सोन्याची नाणी खरेदी करू शकता. बँकांच्या वेबसाइटवरून देखील नाणी खरेदी करता येतात. मात्र ग्राहकांनी बँकेकडून सोन्याची नाणी खरेदी करणे टाळले पाहिजे. त्याऐवजी तुम्ही तुमच्या ओळखीच्या आणि विश्वासाच्या सराफाकडून नाणी खरेदी करणे केव्हाही चांगले.

काय आहे कारण?

बँकेत जी सोन्याची नाणी मिळतात ते खूप जास्त उच्च प्रतीची असतात. ही नाणी स्वित्झर्लंड किंवा अन्य पाश्चिमात्य देशातून आयात केली जातात. त्यामुळे बँकांकडून ही नाणी बाजार भावापेक्षा 7 ते 10 टक्के अधिक दराने विकली जातात. त्यामुळे गुंतवणुकीच्या हिशोबाने बँकेकडून सोन्याची नाणी खरेदी करणे फायद्याचे नाही आहे. त्याचप्रमाणे तुम्ही परत ही नाणी बँकेकडे विकू शकत नाहीत. कारण बँक सोने खरेदीचा व्यवहार करत नाही.

(हे वाचा-आजपासून Discount दराने सोने खरेदीची संधी देत आहे सरकार, वाचा 10 महत्त्वाच्या गोष्टी)

बँकेकडून खरेदी केलेली सोन्याची नाणी जर तुम्ही एखाद्या सराफाकडे विकायला गेलात तर तुम्हाला त्याचा बाजार भावच मिळेल. त्याचप्रमाणे तुम्हाला या  नाण्याच्या बदल्यात सहज रोख रक्कम देखील उपलब्ध होणार नाही. कारण मोठे आणि विश्वासू सराफ सोन्याची नाणी घेऊन कॅश देत नाहीत. तुम्हाला ज्वेलरीमध्ये ही नाणी एक्सचेंज करावी लागतील. आपात्कालीन परिस्थितीत तुम्हाला ही नाणी एखाद्या लोकल सराफाकडे विकावी लागली तर त्याला हवी ती किंमत तो तुम्हाला देऊ शकतो.

First published:

Tags: Gold