Home /News /money /

Investment Tips: या 10 शेअर्सने 5 वर्षात 10 लाख रुपयांचे केले 1.7 कोटी रुपये, पाहा कोणते आहे हे स्टॉक्स

Investment Tips: या 10 शेअर्सने 5 वर्षात 10 लाख रुपयांचे केले 1.7 कोटी रुपये, पाहा कोणते आहे हे स्टॉक्स

आज आम्ही तुम्हाला अशा 10 शेअर्सची माहिती देणार आहोत ज्यांनी गेल्या 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना (Investor) प्रचंड पैसा कमवून दिला आहे. ज्या गुंतवणूक दारांनी 5 वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये 10 लाख रुपये गुंतवले होते त्यांचे आता 1.7 कोटी रुपये झाले आहेत.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 16 डिसेंबर : शेअर बाजारात गुंतवणूक करू नकोस, तिथल्या पैशांचा भरवसा नसतो असा सल्ला देणारी ज्येष्ठ मंडळीही 2020 च्या कोरोना महामारीनंतर (Covid-19 pandemic) शेअर बाजारात गुंतवणूक करायला लागली. लॉकडाउन, बेरोजगारी आणि इतर प्रश्नांमुळे पैसे कमवण्याचं चांगलं साधन म्हणून गेल्या दोन वर्षांत अगदी सामान्य नागरिकांनीही भारतीय शेअर बाजारात (Stock Market) गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जिथं कधीच सेन्सेक्स, तेजी-मंदी असे शब्द ऐकायला मिळायचे नाहीत अशा सर्व वयोगटांतील कट्ट्यांवर हे शब्द ऐकायला मिळत आहेत. तुम्हीही गुंतवणूक करत असाल किंवा नसालही तरीही ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 10 शेअर्सची माहिती देणार आहोत ज्यांनी गेल्या 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना (Investor) प्रचंड पैसा कमवून दिला आहे. ज्या गुंतवणूक दारांनी 5 वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये 10 लाख रुपये गुंतवले होते त्यांचे आता 1.7 कोटी रुपये झाले आहेत. एका रिपोर्टनुसार गुजरातमधील अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) ही कंपनी 2016 ते 2021 या काळात सर्वांत मोठी वेल्थ क्रिएटर कंपनी म्हणून पुढे आली आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वर्षाला 93 टक्क्यांनी वाढ केली आहे. गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून देणारे कोणते आहेत 10 शेअर्स? अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission), दीपक नाइट्रेट (Deepak Nitrite), अदानी एंटरप्राइजेज (Adani Enterprises), टनाला प्लॅटफॉर्म (Tanla Platforms), रुची सोया (Ruchi Soya), अलकाइल अमाइन्स (Alkyl Amines), वैभव ग्लोबल (Vaibhav Global), APL अपोलो ट्युब्ज (APL Apollo Tubes), P&G हेल्थ (P&G Health) आणि एस्कॉर्ट्स (Escorts) कोणत्या स्टॉकने कमवून दिली किती संपत्ती? अदानी ट्रान्समिशननंतर दीपक नाइट्रेटनी गुंतवणुकदारांच्या संपत्तीत वर्षाला 90 टक्के वाढ करून दिली आहे. गेल्या 5 वर्षांत अदानी इंटरप्रायजेसनी 86 टक्के, टनाला प्लॅटफॉर्मनी 85 टक्के, रुची सोयानी 81 टक्के, अलकाइल अमाइन्सनी 79 टक्के, वैभव ग्लोबलनी 64 टक्के, एपीएल अपोलो ट्यूब्जनी 60 टक्के, पी अँड जी हेल्थनी 57 टक्के आणि एस्कॉर्ट्सनी 56 टक्के एवढी वाढ आपल्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत करवून दिली आहे.

22रुपयांचा हा शेअर एका वर्षात झाला 354रुपये,1 लाखाचे झाले 16 लाखांहून अधिक रुपये

5 वर्षांपूर्वी काय P/E होता? या 10 पैकी 7 शेअर्स पाच वर्षांपूर्वी 20 किंवा त्याहीपेक्षा कमी P/E वर ट्रेड करत होते. यावरून हे लक्षात येतं की तुम्ही चांगल्या दर्जेदार स्टॉकची नफा मिळवून देणारी किंमत ओळखली तर ते तुम्हाला संपत्ती मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कालही हे सगळे शेअर्स बऱ्याच वरच्या पातळीवर ट्रेड होत होते. एकूणात विचार केला तर भारतात संपत्ती निर्माण करण्याचा सध्याचा जो वेग आहे तो या आधी कधीच नव्हता असं दिसून येतं. गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदार आणि आंत्रप्रेन्युअर्सनी इक्विटीच्या माध्यमातून 71 लाख कोटी रुपयांची संपत्ती निर्माण केली आहे जी आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम आहे.

35 पैशांचा शेअर पोहोचला 200 रुपयांवर! 3 वर्षात 1 लाखाचे बनले 5 कोटींपेक्षाही जास

ही बातमी वाचल्यावर शेअरची योग्य निवड कसा फायदा कमवून देऊ शकते हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यामुळे अभ्यास करून व योग्य सल्ला घेऊनच शेअर बाजारात गुंतवणूक करायला हवी.
First published:

Tags: Investment, Share market

पुढील बातम्या