Home /News /news /

UPSC : कंडक्टरचा कलेक्टर होण्याच्या दिशेनं प्रवास, आता उरलाय एकच स्टॉप!

UPSC : कंडक्टरचा कलेक्टर होण्याच्या दिशेनं प्रवास, आता उरलाय एकच स्टॉप!

दररोज 8 तासांची नोकरी सांभाळून त्याने कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय अभ्यास केला आणि युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. आता कंडक्टर ते आयएएस होण्याच्या त्याच्या प्रवासात एकच स्टॉप उरला आहे.

    बेंगळुरू, 28 जानेवारी : शिकण्याची जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यश तुमच्यापासून फार दूर नाही राहत. झोपल्यानंतर पडणारी ती स्वप्नं नव्हे तर तुम्हाला झोपू देत नाहीत ती स्वप्नं असतात. तसंच आपलं प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून एका तरुणाने बस कंडक्टरची नोकरी पत्करली. ही नोकरी करत असतानाच त्याने दररोज पाच तास अभ्यास केला आणि आता लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला. दोनच महिन्यांत त्याची मुलाखत होणार आहे. मुलाखतीचे दिव्य पार केल्यानंतर तो आयएएस किंवा आयपीएस होईल. खरंतर हा प्रवास स्वप्नवत वाटत असला तरी तो खडतर असाच होता. कर्नाटकातील बेंगळुरू मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट कार्पोरेशनमध्ये कंडक्टर म्हणून काम करणारा मधु युपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. परीक्षेचा निकाल पाहताच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण त्याला आयएएस होण्याच्या दिशेने प्रवास करता येणार आहे. मधु सध्या 29 वर्षांचा आहे. गेल्या वर्षी त्याने जूनमध्ये पूर्व परीक्षा दिली होती. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर तो मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरला होता. आता त्याने मुख्य परीक्षाही उत्तीर्ण केली असून 25 मार्चला मुलाखत होणार आहे. त्याला आशा आहे की आयएएस होण्याचं त्याचं स्वप्न सत्यात उतरेल. बस कंडक्टर म्हणून त्याने वयाच्या 19 व्या वर्षी नोकरी सुरु केली. बारावीचे शिक्षण झाल्यानंतर नोकरी लागली. तेव्हा नोकरी सांभाळत त्याने पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. राज्यशास्रात पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर त्याने युपीएससीची तयारी सुरु केली.युपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मधु म्हणतो की, माझ्या आई वडिलांना माहिती नाही की मी कोणती परीक्षा उत्तीर्ण झालोय. पण ते खूप आनंदी आहे. मी माझ्या कुटुंबातला शिक्षण घेणारा पहिलाच व्यक्ती आहे. दिवसाचे 8 तास कंडक्टर म्हणून काम केल्यानंतर खूप थकवा यायचा. अनेक तास गर्दीतून प्रवास करत तिकिटे फाडायची होती. आता मुलाखत पास झाल्यावर बीएसटीसीच्या मॅनेजिंग डायरेक्टरसारखं आएएस होणार असं मधु म्हणतो. नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाताना सहज विसरता या गोष्टी, एकदा वाचा पहिल्याच प्रयत्नात हे यश मधुला मिळालेलं नाही. याधी त्याने 2014 मध्ये राज्यसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. मात्र त्यात यश मिळालं नाही. त्यानंतर 2018 मध्ये युपीएससीची परीक्षाही दिली होती. तेव्हाही उत्तीर्ण होता आलं नव्हतं. आता मुख्य परीक्षा दिल्यानंतर सध्याच्या बीटीएमसीच्या मॅनेजिंग डायरेक्टर आयएएस शिखा यांनी आठवड्यातून दोन तास मुलाखतीसाठी मार्गदर्शन केल्याचं मधु सांगतो. दररोजची आठ तासांची नोकरी सांभाळताना अभ्यास करणं हे एक आव्हान होतं. ते पेलताना बरीच कसरत करावी लागली. नोकरी करत घरच्यांना हातभार लावला. त्याचबरोबर स्वप्नाच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी दररोज 5 तास अभ्यासही केला. पहाटे 4 वाजता उठून अभ्यास करायचा आणि त्यानंतर कामावर जायचं. यासाठी कुठेही कोचिंग क्लास लावले नव्हते असंही मधुने सांगितले. Board Exams 2020: पेपर सोडवताना योग्य पद्धतीनं Time management कसं कराल?
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Upsc

    पुढील बातम्या