Home /News /national /

ड्रोनचे शौकिन असाल तर, बातमी वाचाच! ड्रोनचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी उरलेत 2 दिवस

ड्रोनचे शौकिन असाल तर, बातमी वाचाच! ड्रोनचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी उरलेत 2 दिवस

ड्रोनच्या रजिस्ट्रेशनसाठी 31 जानेवारी, 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दोन दिवसात ड्रोनचं रजिस्ट्रेशन केलं नाहीत तर जेलची हवा खावी लागेल. कसं करायचं रजिस्ट्रेशन?

    नवी दिल्ली, 28 जानेवारी : जर तुमच्याकडे ड्रोन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्याला कारणही तसंच आहे. नागरी उड्डाण मंत्रालयानं ड्रोन मालकांना आणि ड्रोन उडवणाऱ्यांना आपल्या ड्रोनचं रजिस्ट्रेशन करण्यास सांगितलं आहे. ड्रोनच्या रजिस्ट्रेशनसाठी 31 जानेवारी, 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जर तुम्ही या मुदतीपर्यंत आपल्या ड्रोनचं रजिस्ट्रेशन केलं नाही तर, तुमच्यावर कारवाईही देखील होऊ शकते. ड्रोनचं रजिस्ट्रेशन केलं नाही तर भारतीय दंड संहिता आणि विमान अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. 9 हजार ड्रोन्सचं रजिस्ट्रेशन 14 जानेवारीपासून ड्रोनचं रजिस्ट्रेशन सुरू झालं असून जर तुमच्याकडे ड्रोन असेल तर, 31 जानेवारी अगोदर त्याचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे अन्यथा तुमच्यावर कारवाई होऊ शकते. संबंधित : तुम्हाला ड्रोन उडवायचं आहे? आधी वाचा हे नियम आतापर्यंत 9 हजार ड्रोन्सचं रजिस्ट्रेशन करण्यात आल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्रालयानं ट्विटरवरून दिली. आपला ड्रोन करा रजिस्टर ड्रोन रजिस्ट्रेशन करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयानं वेबसाईट जारी केली असून http://digitalsky.dgca.gov.in/ इथं तुम्ही आपला ड्रोन रजिस्टर करु शकता. रजिस्ट्रेशन नंतर तुम्हाला दोन युनिक नंबर दिले जातील. हेच दोन नंबर तुम्हाला ड्रोन ठेवण्याचे अधिकार देतात. ड्रोनसाठी आयडी नंबर ड्रोनसाठी नागरी उड्डाण महासंचालनालयाने(DFCA)ऑगस्ट, 2018 रोजी CAR लागू केलं होतं. या अंतर्गत ड्रोन मालकांना आपल्या ड्रोनसाठी एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UIN) घेणं आवश्यक असतो. त्याचबरोबत परमिट आणि अन्य मंजुरीही घेणं यामध्ये येतात.

    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Drone

    पुढील बातम्या