मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मित्राच्या Whatsapp ला बहिणीचा फोटो, संतापलेल्या भावाने केले चाकूने वार

मित्राच्या Whatsapp ला बहिणीचा फोटो, संतापलेल्या भावाने केले चाकूने वार

आपल्या बहिणीचा फोटो मित्राच्या व्हॉट्सअप स्टेटसला पाहून भावाच्या रागाचा पारा चढला. त्याने थेट चाकूने त्याच्यावर वार केले.

आपल्या बहिणीचा फोटो मित्राच्या व्हॉट्सअप स्टेटसला पाहून भावाच्या रागाचा पारा चढला. त्याने थेट चाकूने त्याच्यावर वार केले.

आपल्या बहिणीचा फोटो मित्राच्या व्हॉट्सअप स्टेटसला पाहून भावाच्या रागाचा पारा चढला. त्याने थेट चाकूने त्याच्यावर वार केले.

  • Published by:  desk news

उल्हासनगर, 31 डिसेंबर: आपल्या मित्राच्या (Friend) व्हॉट्सअप स्टेटसला (Whats app status) बहिणीचा फोटो (Photo of sister) पाहून संतापलेल्या भावाने (Brother) मित्रावर चाकूने वार (Attack) केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) समोर आली आहे. अगदी जिवाभावाचे मित्र असलेल्या दोघांमध्ये बहिणीचा फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवण्यावरून वाद झाला. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि त्यानंतर मित्रानेच मित्रावर चाकूचे वार केले.

काय आहे प्रकरण?

उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या रोहित कंजानी नावाच्या तरुणाने स्वतःच्या व्हॉट्अप स्टेटसला त्याचा मित्र विजय रुपाणी याच्या बहिणीचा फोटो लावला होता. ही बाब विजयला मान्य नव्हती आणि ताबडतोब आपल्या बहिणीचा फोटो स्टेटसवरून काढून टाकावा, अशी मागणी त्याने केली होती. मात्र जिचा फोटो आपण लावला आहे, तिचा काही आक्षेप नसताना तू का आक्षेप घेत आहेस, असा रोहितचा सवाल होता. या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडणं झाली होती. त्यानंतर विजयनं रोहितचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

असे केले वार

विजयनं पंकज कुकरेजा नावाच्या एका तरुणाला सोबत घेऊन रोहितवर हल्ला करण्याचा कट आखला. सोबत एक चाकू घेऊन ते दोघं रोहितला भेटायला गेले आणि त्याच्यावर अचानक चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात रोहित गंभीर झाला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती सध्या गंभीर असून डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. मित्रावर खुनी हल्ला करून विजय आणि त्याचा मित्र फरार झाले.

हे वाचा- 4 मुलांसह विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; धक्कादायक घटनेनं जालना हादरलं

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी विजय आणि पंकजविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दोघंही फरार झाले होते आणि पोलिसांना त्यांचा मागमूस लागत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी त्यांची सूत्रं कामाला लावली आणि ते दोघं एका चौकात येणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली. तिथं सापळा रचून पोलिसांनी दोघांच्या मुस्क्या आवळल्या.

First published:

Tags: Crime, Murder, Police, Whatsaap