Home /News /maharashtra /

4 मुलांसह विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; धक्कादायक घटनेनं जालना हादरलं

4 मुलांसह विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; धक्कादायक घटनेनं जालना हादरलं

Suicide in Jalna: जालना जिल्ह्यातील घुंगर्डे हादगाव याठिकाणी एका विवाहित महिलेनं आपल्या 4 पोटच्या मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या (married woman commits suicide along with 4 children) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    जालना, 31 डिसेंबर: जालना (Jalna) जिल्ह्यातील घुंगर्डे हादगाव याठिकाणी एका विवाहित महिलेनं आपल्या 4 पोटच्या मुलांसह विहिरीत उडी (Jump into well) घेत आत्महत्या (married woman commits suicide along with 4 children) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबीक वादातून (Family dispute) महिलेनं हे भयावह पाऊल उचचलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती गोंदी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पाचही जणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी पतीलाला ताब्यात घेतलं आहे. गंगासागर अडाणी असं आत्महत्या करणाऱ्या 32 वर्षीय विवाहित महिलेचं नाव असून 13 वर्षीय भक्ती, 11 वर्षीय ईश्वरी, 9 वर्षीय अक्षरा आणि 7 वर्षीय मुलगा युवराज अशी मयतांची नावं आहेत. आज सकाळी ही खळबळजनक घटना उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी पती ज्ञानेश्वर अडाणी यास अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. हेही वाचा-एकाच दिवशी पेटल्या तीन चिता; 3 वेगवेगळ्या घटनेत नातू, आजोबा अन् आजीचा भयावह अंत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास मृत गंगासागर या आपल्या तीन मुली आणि एका मुलाला घेऊन शेतात गेल्या होत्या. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत त्या शेतातच होत्या, गावातील काही लोकांनी त्यांना शेतात पाहिलं. पण त्यांनतर थोडासा काळोख पडताच चारही मुलांसह गंगासागर अचानक गायब झाल्या. हेही वाचा-लेकाचा अपघातात मृत्यू, वृत्त समजताच आईनंही सोडला जीव, नगरमधील मन हेलावणारी घटना सायंकाळी सातपर्यंत गंगासागर आपल्या मुलांना घेऊन घरी परतल्या नसल्याचं पाहून ज्ञानेश्वर अडाणी आणि गावातील काही नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत पाचही जणांची सर्वत्र शोधाशोध केली. परिसरातील सर्व विहिरी आणि जायकवाडी डावा कालवा परिसर पिंजून काढला. मात्र त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. आज सकाळी पाचही जणांचे मृतदेह शेतातील विहिरीत आढळले आहेत. ही घटना उघडकीस येताच आत्महत्येची माहिती गावात वाऱ्याच्या वेगात पसरली. यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या घटनेचा पुढील तपास गोंदी पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Suicide

    पुढील बातम्या