मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सातारा: रक्षाबंधनाच्या दिवशीच विपरीत घडलं; धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरला अन्...

सातारा: रक्षाबंधनाच्या दिवशीच विपरीत घडलं; धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरला अन्...

धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरून मोठा अपघात झाला आहे. (फोटो-वर्ल्डऑर्ग्स)

धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरून मोठा अपघात झाला आहे. (फोटो-वर्ल्डऑर्ग्स)

ऐन रक्षाबंधनाच्या (Accident on Rakshabandhan) दिवशीच साताऱ्यातील एका तरुणीसोबत विपरीत घटना घडली आहे. धबधबा (Accident at Pabal Waterfall) पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरून मोठा अपघात झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

सातारा, 22 ऑगस्ट: सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं सातारा परिसरात घाट, धबधबा आणि कास पठार पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करत असतात. पण कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या याठिकाणी कमी गर्दी पाहायला मिळत आहे. अशात ऐन रक्षाबंधनाच्या (Accident on Rakshabandhan) दिवशीच साताऱ्यातील एका तरुणीसोबत विपरीत घटना घडली आहे. आपल्या चार-पाच मैत्रिणींसोबत कास पठार जवळील पाबळ धबधबा (Accident at Pabal Waterfall) पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरून मोठा अपघात झाला आहे.

कोसळणाऱ्या धबधब्याखाली भिजत असताना एका 18 वर्षीय तरुणीचा पाय घसरून ती मोठ्या खडकावर जाऊन आदळली आहे. या दुर्दैवी घटनेत संबंधित तरुणी गंभीर जखमी (Badly injured) झाली असून तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. ही घटनेची माहिती मिळताच काही स्थानिक नागरिकांनी तिला त्वरित साताऱ्यातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मेढा पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा-भयंकर ! मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यावसायिकाची डोक्यात गोळ्या झाडून हत्या

सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित 18 वर्षीय जखमी तरुणीचं नाव श्वेता मुकुंद साठे असून ती साताऱ्यातील रहिवासी आहे. जखमी श्वेता आपल्या चार ते पाच मैत्रिणीसोबत जावळी तालुक्यातील एकीव येथील पाबळ धबधबा पाहण्यासाठी आली होती. दरम्यान धबधब्याची मजा लुटताना अचानक श्वेताचा पाय घसरला आणि ती थेट दगडावर जाऊन कोसळली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ती बेशुद्ध पडली.

हेही वाचा-जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिलाच संपवलं; नवविवाहितेच्या हत्येनं पुणे हादरलं

घटनास्थळी असणाऱ्या काही स्थानिक नागरिकांनी तिला त्वरित साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. तिच्या प्रकृतीबाबत अधिकची माहिती अद्याप समोर आली नाही. डॉक्टर तिच्यावर उपचार करत असून मेढा पोलीस ठाण्यात अपघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Accident, Satara