मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची डोक्यात गोळ्या झाडून हत्या, 24 तासांत पोलिसांनी आवळल्या तीन आरोपींच्या मुसक्या

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची डोक्यात गोळ्या झाडून हत्या, 24 तासांत पोलिसांनी आवळल्या तीन आरोपींच्या मुसक्या

Transport businessman shot dead in gondia: गोंदिया शहरात ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

गोंदिया, 22 ऑगस्ट : गोंदिया (Gondia) शहरात व्यावसायिकाची हत्या (Businessman murder) करण्यात आली आहे. आरोपींनी डोक्यात गोळ्या झाडून हत्या (Businessman shot dead) केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोंदिया शहरातील गणेश नगर येथे राहणारे अशोक कौशिक या ट्रान्सपोर्ट व्यवसायिक यांची शनिवारी सकाळी 8 वाजता हत्या करण्यात आली. मॉर्निग वाकला जात असतांना एका अज्ञात आरोपीने पाठीमागून येत त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली.

हत्येनंतर आरोपीने घटना स्थळापासून काही अंतरावर बंदूक फेकून देत पळ काढल्याची घटना घडली. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी 24 तासांच्या आत तीन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.

ज्वेलर्स भरत जैन हत्या प्रकरणाचा उलगडा? पोलिसांनी दोघांना केली अटक

अशोक कौशिक यांचा सर्कस ग्राउंड परिसरात एनसीसी नावाने ट्रान्सपोर्ट व्यवसाय असून ते रोजच्या प्रमाणे शनिवारी (21 ऑगस्ट 2021) देखील सकाळी 8 वाजताच्या दरम्यान घराबाहेर निघत सर्कस ग्राउंडकडे जात असताना एका अज्ञात इसमाने पाठी मागून येत त्यांच्या मानेवर बंदुकीने गोळी झाडत पळ काढला. यावेळी त्याने स्वतः जवळील बंदूक देखील आरोपीने घटनास्थळी फेकून दिली.

दरम्यान रस्त्यावर जाणाऱ्या लोकांनी अशोक यांचे मृतदेह पाहता गोंदिया शहर पोलिसांना याची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले असून गोंदिया शहर पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करून आरोपींच्या शोध सुरू केला. पोलिसांनी 24 तासाच्या आत सतिश बनकर, चिंटू शर्मा व दीपक भूते यांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

First published:

Tags: Crime