मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

काय सांगता! तरुणानं अख्खी रात्र काढली वाघाच्या पिंजऱ्यात, नंतर झालं असं...

काय सांगता! तरुणानं अख्खी रात्र काढली वाघाच्या पिंजऱ्यात, नंतर झालं असं...

सिद्धार्थ उद्यानात चक्क वाघाच्या पिंजऱ्यात एक तरुण घुसल्याने मोठी खळबळ उडाली.

सिद्धार्थ उद्यानात चक्क वाघाच्या पिंजऱ्यात एक तरुण घुसल्याने मोठी खळबळ उडाली.

सिद्धार्थ उद्यानात चक्क वाघाच्या पिंजऱ्यात एक तरुण घुसल्याने मोठी खळबळ उडाली.

  • Published by:  Sandip Parolekar
औरंगाबाद, 6 जून: शहरातील सिद्धार्थ उद्यानात चक्क वाघाच्या पिंजऱ्यात एक तरुण घुसल्याने मोठी खळबळ उडाली. मात्र, वाघ बंदिस्त असल्याने तरुणाचा जीव थोडक्यात बजावला. उद्यान प्रशासन व पोलिसांनी त्या तरुणाला बाहेर काढून त्याची सुटका केली. रवींद्र ससाणे (30, रा. श्रीकृष्णनगर, पिसादेवी) असं या तरुणाचं नाव आहे. तरुण मनोरुग्ण असल्याचं समजतं. तो रात्री वाघाच्या पिंजऱ्यात घुसला होता. अख्खी रात्र त्यानं वाघाच्या पिंजऱ्यात काढली. हेही वाचा...पुण्यातल्या 'मर्दानी'ने केली मोठी कारवाई, अवैध गांजा विकणाऱ्यांमध्ये खळबळ घाटीत उपचार घेत आहे मनोरुग्ण.. रवींद्र ससाणे हा घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. प्राणिसंग्रहालयातील मागील भिंत कमकुवत झाली आहे. येथूनच तरुण उद्यानाजवळ आला. रात्री उशिरा या तरुणाने प्राणिसंग्रहालयाच्या मागील बाजूने भिंतीवरून आत उडी मारली. त्यात तो नेमका वाघाच्या पिंजऱ्यात सर्व्हिस एरियात पडला. मात्र, वाघांना आतील पिंजऱ्यात बंद करण्यात आलेले होते. त्यामुळे त्याला कोणताही धोका झाला नाही. मात्र, बाहेर पडण्यास रस्ता नसल्याने तो रात्रभर तिथेच बसून होता. सकाळी कर्मचारी प्राणिसंग्रहालयात आले. अचानक पिंजऱ्याजवळील वाघाच्या फिरण्याच्या जागेत तो तरुण बसल्याचे पाहून कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर पोलिसांना बोलावून या तरुणाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याची चौकशी केली. मात्र, तो वेडसर असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्या वडिलांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले. हेही वाचा...धक्कादायक! शिकाऊ नर्सची काढली छेड, बीड रुग्णालयातील व्हिडिओ आला समोर या घटनाच्या पार्श्वभूमीवर आणखी पाच सुरक्षा कर्मचारी प्राणिसंग्रहालयात उपलब्ध करून देण्याची मागणीही अधिकाऱ्यांनी मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली.
First published:

पुढील बातम्या