बीड, 5 जून: राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. डॉक्टर आणि नर्स रात्रंदिवस आपलं रुग्णसेवेचं कर्तव्य बजावत आहे. मात्र, एका नर्सची छेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात अपघात विभागात सेवा देणाऱ्या एका प्रशिक्षणार्थी नर्स विद्यार्थिनीची छेड काढण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे रुग्णालयातील कर्मचाऱ्याने हे कृत्य केलं आहे. पीडित नर्सच्या नातेवाईकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला.
शिकाऊ नर्सची काढली छेड, बीड रुग्णालयातील व्हिडिओ आला समोर#CoronaWarriors #coronainmaharashtra #Beed pic.twitter.com/dUuwnhfxCf
— News18Lokmat (@News18lokmat) June 5, 2020
या वादामुळे जिल्हा रुग्णालयातील चांगलाच गोंधळ उडाला. अचानक सुरू झालेल्या गोंधळामुळे महिला कर्मचारी घाबरून गेल्या कर्मचारी छेड काढत असल्याची तक्रार दोन दिवसापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, हा प्रकार नर्सच्या नातेवाईकांना समाजल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला चांगला चोप देण्यात आला. हेही वाचा.. …तर त्या शासकीय कर्मचाऱ्याचा पगार कपात करावा, सरकारचा नवा आदेश जिल्हा रुग्णालयात एएनएम, जीएनएमच्या विद्यार्थिनी शिक्षणासाठी आहेत. त्यांना अपघात व इतर विभागात ड्युटी लावली जाते. प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीची रुग्णालयात कार्यरत असणाऱ्याच एका कर्मचारी छेड काढत होता. शुक्रवारी दुपारी या विद्यार्थिनीचे नातेवाईक आदित्य महाविद्यालयात आले. कर्मचारी व नातेवाईक समोरासमोर येताच त्यांच्यात चांगलीच हाणामारी झाली. इतर कर्मचारी व रुग्णाच्या नातेवाईकांनी सोडवासोडव केली. दोघांच्या वादात रुग्णालयातील खुर्च्या, टेबल व इतर साहित्याची तोडफोड झाली आहे. त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. तसेच या वादामुळे रुग्ण व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हेही वाचा… नोटांमुळे कोरोना पसरतो? धास्तावलेल्या दुकानदारांनी मोदी सरकारकडे केली ही मागणी