सुमित सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 06 जून : राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना पुण्या मात्र अवैध धंद्यांवर मोठी छापेमारी करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील गिरीम इथे गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यास अटक करून त्याच्याकडील 21 लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी (आयपीएस) ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. इतकंच नाही तर दौंडमध्ये कोणतंही अवैध काम आम्ही चालू देणार नाही असा पवित्राच या मर्दानीनं घेतल्यामुळे टवाळखोर आणि असं अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ऐश्वर्या शर्मा आणि त्यांच्या टीमने केलेल्या या कामगिरीमुळे त्यांचं शहरात कौतूक होत आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पुढाकाराने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना गिरीम इथे गांजाची शेती केली जात असल्याची माहीती मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस करवाईचे आदेश दिले होते. चक्रीवादळानं मुंबईचं आर्थिक कंबरडं मोडलं, या शहरात झालं सव्वा कोटीचं नुकसान दौंड तालुक्यातील गिरीम इथल्या शिंदे वस्ती इखे पोलिसांनी छापा टाकून गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिरीम गावातील दत्तू शंकर शिंदे या शेतकऱ्याने तब्बल 4 गुंठे क्षेत्रात सहज दिसणार नाही अशा छुप्या पद्धतीनं गांजाची शेती केली होती. पोलिसांनी शेतातील गांज्याची झाडं उपटून काढून जप्त केली आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज मनामनात,शिवराज्याभिषेक घराघरात’; रायगडावर सोहळा सुरू या कारवाईत जवळपास 173 झाडे आणि विक्रीसाठी ठेवलेल्या सुक्या स्वरूपातील 140 किलो गांजा असा 21 लाख 01 हजार 500 रुपयांचा गांजा जप्त केला आहे. तर या शेकऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी (आयपीएस) ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट,दौंड पोलीस निरीक्षक सुनील महाडीक,सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड,आदी पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कारवाई करण्यात आली. कोरोनाने पुन्हा एकदा देशात विक्रम मोडला, 24 तासांतली ही आकडेवारी धक्कादायक संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.