• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • खळबळजनक! आत्मा मालिक ध्यानपीठ वसाहतीत 24 वर्षीय तरुणीची आत्महत्या

खळबळजनक! आत्मा मालिक ध्यानपीठ वसाहतीत 24 वर्षीय तरुणीची आत्महत्या

तरुणीचे वडील जंगली महाराज आश्रमात नोकरीस असून ते आपल्या कुटुंबीयासमवेत कर्मचारी वसाहतीत वास्तव्यास आहे.

  • Share this:
शिर्डी, 11 जुलै: कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीतील आत्मा मालिक ध्यानपीठ कर्मचारी वसाहतीत एका 24 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घरासमोरील पढवीच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून तरुणीनं आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. हेही वाचा...श्रद्धांजली सभेतच झाला राडा, फुलं वाहण्याऐवजी लोकांनी केली हाणामारी! उज्वला शेळके असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. मात्र तिच्या आत्महत्येच्या कारण अद्याप स्पष्ट होवू शकलेलं नाही. कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. सदर तरुणीचे वडील जंगली महाराज आश्रमात नोकरीस असून ते आपल्या कुटुंबीयासमवेत कर्मचारी वसाहतीत वास्तव्यास आहे. भगवान बाबुराव शेळके (वय-55) यांनी या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यात कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत जंगली महाराज आश्रमात आत्मा मलिक कर्मचारी वसाहतीत रहिवाशी व नोकरीत असलेले भगवान बाबुराव शेळके हे आपली पत्नी, दोन मुली असे कुटूंबासमवेत राहतात. त्यांतील एक 24 वर्षीय मुलगी उज्वला भगवान शेळके हिने शनिवारी पहाटेच्या अडीच वाजेच्या सुमारास नैसर्गिक विधीच्या निमित्ताने घरातून बाहेर पडली. नंतर तिने कोणालाही काही न सांगता बाहेरील पढवीच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला आहे. बराच उशीर होऊनही मुलगी घरात का आली नाही, याची चौकशी करण्यासाठी आई-वडील घराबाहेर आले असता, त्यांना उज्ज्वलाचा मृतदेह घरातून बाहेर पढवीत लटकलेल्या अवस्थेत दिसला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांनी भेट दिली आहे. हेही वाचा...शिर्डीच्या साई मंदिर परिसरात बॉम्ब! निनावी फोननं उडाली एकच खळबळ या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी मुलीचे वडील भगवान शेळके यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल ए.एम. दारकुंडे हे करीत आहेत.
Published by:Sandip Parolekar
First published: