जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिर्डीच्या साई मंदिर परिसरात बॉम्ब! निनावी फोननं उडाली एकच खळबळ

शिर्डीच्या साई मंदिर परिसरात बॉम्ब! निनावी फोननं उडाली एकच खळबळ

शिर्डीच्या साई मंदिर परिसरात बॉम्ब! निनावी फोननं उडाली एकच खळबळ

साई मंदिर परिसरात बॉम्ब सदृश्य संशयास्पद वस्तू असल्याचा फोन आला आणि शिर्डीच्या स्थानिक प्रशासनाची एकच धावपळ उडाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

शिर्डी, 11 जुलै: साई मंदिर परिसरात बॉम्ब सदृश्य संशयास्पद वस्तू असल्याचा फोन आला आणि शिर्डीच्या स्थानिक प्रशासनाची एकच धावपळ उडाली. शिर्डी पोलिस, अग्निशमन दल, बॉम्ब शोधक पथक, डॉग स्कॉड आणि आरोग्य पथक पुढील 15 मिनिटांत घटनास्थळी पोहचलं. सगळीकडे धावाधाव सुरू झाली मात्र हे मॉकड्रील असल्याचं समजल्यानंतर सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. हेही वाचा… विकास दुबेच्या 2 साथीदारांना मुंबईत अटक, धक्कादायक माहिती समोर शिर्डीच्या साई मंदिराचा समावेश हा ‘अ’ वर्ग देवस्थानामध्ये होतो. दररोज हजारो आणि वर्षाकाठी कोटींच्या घरात भाविक शिर्डीत येत असतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने देखील शिर्डी हे संवेदनशील समजले जाते. तर अनेक वेळा साई मंदिर प्रशासनाला धमकीचे फोन देखील येत असतात. असाच एक फोन 11 जुलै रोजी शिर्डी प्रशासनातील वेगवेगळ्या विभागांना आला आणि प्रशासनाची एकच धावपळ उडाली. साई मंदिर परिसरात बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचा हा निनावी फोन होता. त्यांनतर प्रशासन सावध झालं आणि शिर्डी पोलिस, अग्निशमन दल, बॉम्ब शोधक आणि निवारण पथक, डॉग स्कॉड आणि आरोग्य पथक पुढील 15 मिनिटांत घटनास्थळी पोहचलं. प्रशासनाची धावपळ बघून शिर्डीतील नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरलं होतं. बॉम्ब शोधक पथक, डॉग स्कॉडच्या सहाय्याने संशयास्पद वस्तू शोधण्यात आली. मात्र आपत्कालीन परिस्थितीत शिर्डीतील सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहेत, याची तालीम घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून निनावी फोन करून चाचपणी करण्यात आल्याचे समजताच प्रशासनासह शिर्डीतील नागरिकांनी देखील सुटकेचा निःश्वास सोडला. हेही वाचा… सरकार पाडण्यासाठी काँग्रेस आमदारांना भाजपची 15 कोटींची ऑफर, मुखमंत्र्यांचा आरोप सध्या शिर्डीचे साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी मंदिर आणि परिसरातील सुरक्षेसाठी यंत्रणा नेहमी तत्पर असणे गरजेचे असल्याने हा माँक ड्रिल करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात