गुजरात 11 जुलै: एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी एका श्रद्धांजली सभेचं आयोजन केलं होतं. मात्र त्या शोकसभेचं रुपांतर राड्यात झालं आणि लोकांमध्येच तुंबळ हाणामारी सुरू झाली. राज्यातलं मोठं व्यापारी शहर असलेल्या सुरतमध्ये ही घटना घडली आहे. सुरतमध्ये एका श्रद्धांजली सभेत कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच लोकांमध्ये वाद झाला. किती लोकांनी जमावं आणि त्याचं स्वरुप काय असवं यावर चर्चा सुरू होती. कोरोनामुळे साधेपणाने कार्यक्रम व्हावा असं एका गटाचं म्हणणं होतं तर दुसऱ्या गटाला कार्यक्रम मोठा व्हावा असं वाटत होतं.
सुरवातीला फक्त लोक चर्चा करत होते. चर्चेचं रुपांतर वादात झालं आणि वादाचं रुपांतर भांडणात. तो वाद एवढा विकापाला गेला की लोकांनी लाथा बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करायला सुरुवात केली. या हाणामारीचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या हाणामारीत महिलाही सहभागी झाल्या होत्या.
त्यामुळे श्रद्धांजली सभा तर झालीच नाही मात्र भांडण सोडविण्याची वेळ लोकांवर आली आणि आयोजकांची बदनामी झाली ती वेगळीच.
हे वाचा - भारतीय वाघांचे आता गिनीज बुकमध्ये नाव, व्याघ्रगणनेने रचला नवा रेकॉर्ड
कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचं कटाक्षाने पाल करण्याचं आवाहन केलं जात आहे. जास्त लोकांनी एकत्र येऊ नये असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे कार्यक्रमाला जास्त लोक असू नयेत असं सांगितलं जात असतानाही अनेक ठिकाणी कार्यक्रमांना गर्दी होत आहे.
गुजरातमध्ये सुरत हा हॉटस्पॉट ठरला आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण याच शहरात सापडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने जास्त काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.