येवला, 03 नोव्हेंबर : सर्वत्र दिवाळीची (diwali) धामधूम सुरू आहे. दिवाळी सणाच्या उत्सवासाठी जोरदार तयारी सुरू आहे. पण दुसरीकडे जगाचe पोशिंदा बळीराजाच्या घरात अजूनही अंधारच अंधार आहे. नाशिक (nashik) जिल्ह्यातील येवला ( yeola) तालुक्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येवला तालुक्यातील रेंडाळे गावात ही घटना घडली आहे. अशोक लांडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान आणि डोक्यावर बँकेचे असलेल्या कर्जाला कंटाळून लांडे यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.
पंतप्रधान मोदींची यंदाची दिवाळी काश्मीरमध्ये, राजौरीतील सैनिकांसोबत उजळणार दिवे
अशोक लांडे यांनी एचडीएफसी बँकेकडून 3 ते 4 लाखांचे कर्ज घेतले होते. पण कर्ज वेळेवर न फेडल्यामुळे हफ्त्यावर आणखी व्याज आकारले जात होते. हफ्ता भरण्यासाठी बँकेकडून वारंवार तगादा लावला जात होता. आधीच अतिवृष्टीमुळे शेतात आलेले हातातोंडाशी आलेले पिक पाण्यात गेल्यामुळे अशोक लांडे यांच्यापुढे कर्ज फेडण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर याच जाचातून त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.
Netflix कडून 5 नव्या गेम्सची घोषणा,वेगळ्या सब्सक्रिप्शनची गरज?जाणून घ्या प्रोसेस
ऐन दिवाळीच्या तोंडावर अशोक लांडे यांनी आत्महत्या केल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले. अशोक लांडे यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.